नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur Kiri) घडलेल्या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहे. या हिंसाचाराच्या (Lakhimpur Kheri Violent) घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना चिरडणारी कार आपल्या मालकीची आहे पण आपला मुलगा यामध्ये सहभागी नव्हता असे अजय मिश्रा सांगत आहेत. तसंच त्यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली असल्याचा दावा केला आहे. या घटनेचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ (Lakhimpur Kheri Video) समोर आले आहेत. पण आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला असून यामध्ये स्पष्टमध्ये कारने आंदोलक शेतकऱ्यांना (Farmers) कशापद्धतीने चिरडले आहे हे दिसत आहे.Also Read - Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला 'या' राजकीय पक्षांसह व्यापारी संघटनांनी दिला पाठिंबा, आंदोलनं आणि निदर्शने केली जाणार!

Also Read - Maharashtra Bandh: महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ( Video Viral on Social Media) तुफान व्हायरल होत असून याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की काळ्या रंगाची एसयुव्ही कार (SUV Car) वेगाने येत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून ही कार थेट निघून जाते. या घटनेमध्ये चार शेतकरी आणि चार इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली. या घटनेचे तीव्र पडसाद आता देशभरात उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. लखीमपूर खीरी घटनेच्या (Lakhimpur Khiri incident ) निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. Also Read - Lakhimpur Kheri Violent: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरण, केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अखेर अटक!

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्वकाही स्पष्टपणे दिसत आहे. अजय मिश्रा यांनी जो दावा केला आहे की, गाड्यांवर दगड आणि वीटांचा हल्ला होत होता पण असे काहीच त्यामध्ये दिसत नाही. गाडी चालक शेतकऱ्यांना चिरडून अतिशय वेगाने कार घेऊन गेला असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरुन भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Congress leader Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लखनऊला गेले, पण ते लखीमपूर खीरीला गेले नाहीत, हा केंद्र सरकारचा (Central Government) अहंकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.