नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अखेर शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी (Lakhimpur Kheri Violent) आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी (Uttar Pradesh Police) त्याला शनिवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आशिष मिश्रा चौकशीसाठी हजर झाला. त्याची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला शनिवारी रात्री अटक (Ashish Mishra Arrested)करण्यात आली.Also Read - Rail Roko Andolan: शेतकऱ्यांच्या देशव्यापी रेलरोको आंदोलनाला सुरुवात, मंत्र्याच्या राजीनामा आणि अटकेची मागणी!

Also Read - Ayushman Bharat Rojgar Yojana: रोजगार योजनेच्या नावाखाली तुम्हाला Appointment Letter मिळालं असेल तर सावधान!

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आशिष मिश्रा चौकशीसाठी सहारनपूर पोलिस ठाण्यात (Saharanpur Police Station) हजर झाला. त्याला दुचाकीवरुन एका आमदाराने पोलिस ठाण्यापर्यंत सोडले होते. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली 9 अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने आशिष मिश्रा याची कसून चौकशी केली. तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आशिष मिश्रा याला पोलिसांनी 40 पेक्षा जास्त प्रश्न विचारले. पण अनेक प्रश्नांची उत्तर आशिष मिश्राला देता आली नाही. तसंच तो चौकशीसाठी सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. Also Read - Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला 'या' राजकीय पक्षांसह व्यापारी संघटनांनी दिला पाठिंबा, आंदोलनं आणि निदर्शने केली जाणार!

आशिष मिश्राला रविवारी न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले त्या गाडीमध्ये आशिष मिश्रा होता. शेतकऱ्यांनी आशिषवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पण आशिषचे वडील म्हणजेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेतकऱ्यांना चिरडणारी कार आपल्या मालकीची आहे पण आपला मुलगा यामध्ये सहभागी नव्हता असे अजय मिश्रा सांगत आहेत. तसंच त्यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली असल्याचा दावा केला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Lakhimpur Kheri Violent video viral on social media) देखील झाले आहेत.