नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave Of Corona) ओसरत चालली असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढीमध्ये (Corona Patient) चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे. 24 तासांमध्ये 47 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे, केरळ (Keral) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत.Also Read - दिलासादायक! 86 टक्के मुंबईकरांमध्ये सापडल्या कोरोनाच्या अँटीबॉडीज, 5व्या सेरो सर्वेक्षणातून माहिती समोर

देशामध्ये 1 जुलै रोजी कोरोनाचे 48,786 रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्ण संख्या कमी होत होती. पण अचानक दोन महिन्यांनी रुग्णांच्या आकड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. देशात 24 तासांमध्ये 509 रुग्णांचा मृत्यू (Corona Patient Death) झाला आहे. केरळमध्ये 24 तासांमध्ये 32,803 रुग्ण सापडले आहेत. केरळनंतर महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. देशात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,28,57,937 पर्यंत झाला आहे. Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी लाट (third Wave of Corona) येण्यापूर्वीच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी लसीकरण मोहिम (Corona Vaccination) वेगाने राबवली जात आहे. अशामध्ये काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) काही दिवसांपूर्वीच रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध शिथिल केले. याच दरम्यान, लॉकडाऊन विषयी बोलताना राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी (Health Minister Rajesh Tope) सांगितले की, ‘सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कुठलाच विषय नाही. मात्र, ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊन (Lockdown) किंवा कठोर निर्बंध (Restrictions)लावावे लागतील.’ Also Read - Corona Vaccine Update: मुंबईत उद्या फक्त महिलांनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!