Top Recommended Stories

Lata Mangeshkar Dies: ममता बॅनर्जी सरकारची मोठी घोषणा, पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादीदींचे गाणे...

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सोमवारी म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींचे गाणे वाजणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री ममतादीदींनी घेतला आहे.

Published: February 6, 2022 5:04 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Legendary Singer Lata Mangeshkar:
Legendary Singer Lata Mangeshkar:

Lata Mangeshkar Dies: भारताची कोकिळा… स्वरसम्राज्ञी… भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर (Lata Mangeshkar Dead) संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सोमवारी म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींचे गाणे वाजणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री ममतादीदींनी घेतला आहे.

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी जगाला अलिविदा म्हटले. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये (Mumbais Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. अशातच त्यांची प्राणज्योत (Lata Mangeshkar dies) मालवली. रुग्णालयात उपचार सुरु होते.

You may like to read

पश्चिम बंगालमध्येही दुखवटा… अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

लतादीदींच्या निधनानंतर पश्चिम बंगाल सरकारने देखील दुखवटा जाहीर केला आहे. राज्यात सोमवारी अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने देखील 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.


दुसरीकडे, नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी (President of Nepal Vidyadevi Bhandari) यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. ‘प्रसिद्ध भारतीय गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे ऐकून तिव्र दुःख झाले. ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने अनेक नेपाळी गाणी गायली आहेत. विलक्षण प्रतिभा असलेल्या दिवंगत लता मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली.”, अशा शब्दांत विद्यादेवी भंडारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.