LIC Adharshila Plan: दररोज जमा करा फक्त 29 रुपये आणि मॅच्युरिटीला मिळवा मोठी रक्कम

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम अर्थात एलआयसीची खास महिलांसाठी एक योजना आहे. आधारशिला असे या योजनेचे नाव असून ही योजना अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे.

Published: January 14, 2022 10:24 PM IST

By India.com Lifestyle Staff | Edited by पी.संदीप

LIC's listing is crucial for the government to meet the lowered revenue estimates of Rs 78,000 crore for the current fiscal.
LIC IPO Likely To Open On May 4 And Close On May 9: Report

LIC Insurance Plan: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम अर्थात एलआयसीची (LIC) खास महिलांसाठी एक योजना आहे. आधारशिला (LIC Adharshila Plan) असे या योजनेचे नाव असून ही योजना अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेंतर्गत दररोज 29 रुपये जमा करून महिला मॅच्युरिटीला 4 लाख रुपये मिळू शकतात. ही योजना केवळ महिलांसाठीच (Only for Women) आहे. योजनेंत सहभागी होणाऱ्या महिलांकडे आधारकार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे.

Also Read:

LIC ने ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी लॉन्च केली होती. जीवन सुरक्षेसोबतच ही एक बचत योजना आहे. एखादी महिला या योजनेंतर्गत दररोज 29 रुपये गुंतवणूक करत असेल तर तिला मॅच्युरिटीला 4 लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते.

8 ते 55 वर्षे वयातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे मुदतीत ही योजना खरेदी करता येते.

विम्याची रक्कम

या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. यामध्ये पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो.

किती भरावा लागेल प्रीमियम

महिलेचे वय 20 वर्षे असेल आणि पॉलिसीची मुदत देखील 20 वर्षे असेल. तिने 3 लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक सुमारे 10,649 रुपये प्रीमियम भरावा लागेल. मात्र, पुढील वर्षी हा प्रीमियम 10,868 रुपयांपर्यंत भरावा लागेल.

परिपक्वता लाभ

मॅच्युरिटीला महिलेला 4 लाख रुपये मिळतील. विमा रक्कम म्हणून 2 लाख आणि शिल्लक रक्कमेवर लॉयल्टी बोनस मिळेल.

प्रीमियम पेमेंट

या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केला जाऊ शकतो. तुम्ही वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. परंतु, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याचे निवडल्यास तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

रोख नफा

पॉलिसी सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रकमेएवढी रक्कम दिली जाईल. परंतु, यानंतर मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील मिळेल.

एक करार

मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला एक वेळी पूर्ण पेमेंट किंला ते हप्त्यांमध्ये देखील मिळू शकते.

पॉलिसी सरेंडर

सलग दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 14, 2022 10:24 PM IST