Top Recommended Stories

LIC IPO: ठरलं! या दिवशी येणार एलआयसीचा आयपीओ, जाणून घ्या 10 महत्त्वाच्या बाबी

LIC IPO: एलआयसीच्या आयपीओची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. अकेर पुढील महिन्यात हा आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये लॉन्च (LIC IPO launch) होणार आहे. भारत सरकारने त्याची किंमत देखील निश्चित केली आहे. या आयपीओविषयीच्या 10 महत्त्वाच्या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे.

Published: April 27, 2022 7:17 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

lic share price

LIC IPO: भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजेच एलआयसीचा पब्लिक इश्यूअर ऑफरिंग (IPO) पुढील महिन्यात प्रायमरी मार्केटमध्ये लॉन्च (LIC IPO launch) होणार आहे. हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार LIC IPO सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी (LIC IPO subscription) ओपन होईल आणि 9 मे 2022 पर्यंत बोलीसाठी खुले असेल. भारत सरकारने (GoI) LIC IPO ची किंमत 902 रुपये ते 949 रुपये (LIC IPO Price) निश्चित केली आहे.

Also Read:

भारत सरकारने किरकोळ आणि पात्र कर्मचारी श्रेणीसाठी प्रति इक्विटी शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारक श्रेणीसाठी 60 रुपये प्रति इक्विटी शेअरची सूट जाहीर केली आहे. दरम्यान एलआयसीच्या शेअरची किंमत ग्रे मार्केटमध्येही काम करत आहे. मार्केट तज्ञांच्या मते आज ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचे शेअर्स 48 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. परंतु त्याचे ग्रे मार्केटमध्ये पदार्पण सोमवारी 25 रुपयांच्या प्रीमियमने झाले.

You may like to read

एलआयसी आयपीओशी संबंधित 10 खास बाबी

LIC IPO GMP: एलआयसी आयपीओच्या शेअर्सनी सोमवारी ग्रे मार्केटमध्ये 25 रुपयांच्या प्रीमियमने ट्रेडिंग सुरू केले. LIC IPO GMP आज 48 रुपये आहे, म्हणजे ग्रे मार्केट LIC IPO ची लिस्टिंग सुमारे 997 रुपये (949 + 48 रुपये) अपेक्षित आहे, जी त्याच्या मूळ किंमतीपेक्षा सुमारे 5 टक्के जास्त आहे.

LIC IPO किंमत: भारत सरकारने एलआयसी आयपीओची किंमत 902 ते 949 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे.

सबस्क्रिप्शनसाठी LIC IPO तारीख: विमा कंपनीची सार्वजनिक ऑफर 4 मे 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल आणि 9 मे 2022 पर्यंत बोलीसाठी खुली असेल.

एलआयसी पॉलिसीधारकांसाठी सवलत: भारत सरकारने एलआयसी पॉलिसी धारक अर्जदारांना प्रति इक्विटी शेअर 60 रुपयांची सूट जाहीर केली आहे. परंतु केवळ तेच LIC पॉलिसीधारक या सवलतीसाठी पात्र असतील ज्यांनी त्यांची पॉलिसी 13 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यापूर्वी खरेदी केली होती. या दिवशी LIC ने SEBI कडे DRHP दाखल केला होता.

LIC कर्मचार्‍यांना सूट: भारत सरकारने पब्लिक इशूसाठी अर्ज करणार्‍या LIC कर्मचार्‍यांना प्रति इक्विटी शेअर 45 रुपयांची सूट जाहीर केली आहे.

LIC IPO आकारः भारत सरकारचे उद्दिष्ट आपल्या सार्वजनिक ऑफरमधून 21,008 कोटी रुपये उभारणे आहे, जे 100 टक्के OFS (विक्रीसाठी ऑफर) स्वरूपाचे आहे.

LIC IPO लॉट साइज: अर्जदार IPO साठी लॉटमध्ये अर्ज करू शकतो आणि एका लॉटमध्ये 15 LIC शेअर्स असतात.

LIC IPO अर्ज मर्यादा: बोली लावणार्‍याला LIC IPO च्या किमान एक लॉट आणि कमाल 14 लॉटसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे.

LIC IPO लिस्टिंग: पब्लिक इश्यू NSE आणि BSE दोन्हीवर सूचीबद्ध केला जाईल आणि सार्वजनिक इश्यूची संभाव्य लिस्टिंग तारीख 17 मे 2022 आहे.

LIC IPO रजिस्ट्रार: केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेडची (Keffin Technologies Limited) एलआयसी आयपीओचे अधिकृत रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 7:17 PM IST