Top Recommended Stories

LIC Jeevan Labh Policy: दररोज गुंतवा 252 रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख, जाणून घ्या कोणती आहे योजना?

LIC Jeevan Labh Policy: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) सेक्युरिटीसह गुंतवणुकीवर प्रभावी परतावा देणार्‍या अनेक पॉलिसी ऑफर करते. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची सेवानिवृत्ती सुरक्षित करण्याची संधी मिळते.

Published: January 26, 2022 6:27 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

LIC Jeevan Policy
(FILE PHOTO)

LIC Jeevan Labh Policy: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) सेक्युरिटीसह गुंतवणुकीवर प्रभावी परतावा (Impressive Return) देणार्‍या अनेक पॉलिसी ऑफर करते. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची सेवानिवृत्ती (Retirement Policy) सुरक्षित करण्याची संधी मिळते. कोणतीही व्यक्ती त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात एलआयसी पॉलिसींमध्ये गुंतवणूक (Investment in LIC) करण्यास सुरुवात करू शकते आणि आपल्या इच्छेनुसार वृद्धापकाळ घालवण्यासाठी पुरेशी रोख रक्कम घेऊन निवृत्त होता येईल हे सुनिच्छित करू शकते. एवढेच नाही तर एलआयसी पॉलिसी (LIC policy) तुम्हाला सम अॅश्युअर्ड देखील देते जी पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेत कुटुंबातील सदस्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. अशीच एक योजना आहे एलआयसी जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy).

Also Read:

या पॉलिसीअंतर्गत गुंतवणूकदार आज थोडी गुंतवणूक करून मॅच्युरिटीच्या वेळी लाखो रुपये (Maturity Amount) मिळवू शकतात. ही पॉलिसी गुंतवणुकदारांना असा पर्याय निवडण्याची मुभा देते जी त्यांना सुमारे 20 लाख रुपये देऊ शकते. यासाठी गुंतवणूकदारांना दररोज सुमारे 251.7 रुपये न चुकता गुंतवणूक (Investment) करावी लागेल. गुंतवणूक योजना आयकर अधिनियम कलम 80C अंतर्गत आयकर बचत प्रदान करते. याचा अर्थ गुंतवणूकदार आयकर रिटर्नसह आपली बचत अधिकाधिक करण्याचा पर्याय निवडू शकतात.

You may like to read

LIC जीवन लाभ पॉलिसी सम अॅश्योर्ड

एलआयसी जीवन लाभ योजनेत (LIC Jeevan Labh Policy) किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आहे. या योजनेत विम्याच्या रकमेची कोणतीही कमाल मर्यादा नाही. परंतु, सम अॅश्योर्ड वाढवून तुम्हाला मासिक प्रीमियम अधिक भरावे लागेल.

LIC जीवन लाभ पॉलिसी वयोमर्यादा

LIC जीवन लाभ पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Labh Policy) गुंतवणूक करण्याचे किमान वय 8 वर्षे आहे. तर योजनेत प्रवेश करण्याची जास्तीत जास्त वायोमर्यादा 16 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 59 वर्षे, 21 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 54 वर्षे आणि पॉलिसीसाठी 50 वर्षे आहे.

पॉलिसीधारक 16 ते 25 वर्षांदरम्यानचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतात. प्रीमियम भरण्याची मुदत देखील 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते. गुंतवणूकदार नियमित मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात. गुंतवणूकदारांना मासिक पेमेंटसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो.

जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून 20 लाख रुपये कसे मिळतील

जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Labh Policy) लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात. उदाहरणार्थ, जर एखादा गुंतवणूकदार 16 वर्षांसाठी दररोज सुमारे 251.7 रुपये भरतअसेल, तर त्या व्यक्तीला 25 वर्षानंतर मॅच्युरिटीवर सुमारे 20 लाख रुपये मिळतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 6:27 PM IST