नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडर (lpg cylinder) आणि पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-disel) वाढत्या दरांमध्ये सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. आधीच महागाईने (Inflation ) सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. त्यात सतत एलपीसी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सध्या दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची (Gass cylinder) किंमत 809 रुपये आहे. पण जर तुम्ही इथं सांगितलेल्या पद्धतीने गॅस बुक केला तर तुम्हाला या सिलेंडरवर 800 रुपये कॅशबॅक (Cashback) मिळू शकतील. याचा अर्थ तुम्हाला हा सिलेंडर फक्त 9 रुपयांमध्ये मिळेल. या धमाकेदार ऑफरचा (Dhamakedar Offer) लाभ कसा घ्यायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…Also Read - LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका, आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

Paytm देत आहे 800 रुपयांची कॅशबॅक ऑफर –

paytmने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार तुम्हाला पेटीएमवरुन (Paytm) गॅस सिलेंडर बुक करावा लागेल. या माध्यमातून तुम्हाला जवळपास मोफतच गॅस सिलेंडर मिळेल. Indane, भारत गॅस, HP गॅसचे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत जर एखादा ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अ‍ॅपद्वारे (Paytm App) गॅस सिलेंडर बुक करत असेल तर त्याला 800 रुपये कॅशबॅक मिळतील. जर तुम्ही आतापर्यंत पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुक केला नसेल तर आजच तुम्ही या धमाकेदार ऑफरचा लाभ घेऊ शकता. Also Read - Full Form of Brand Name : Amul पासून ते MDH पर्यंत, जाणून घ्या या प्रसिद्ध कंपन्यांच्या नावांचे फुलफॉर्म

30 जूनपर्यंतच आहे ही ऑफर –

तुम्हाला सुद्धा या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरच आपला गॅस सिलेंडर पेटीएमच्या माध्यमातून बुक करा. कारण 30 जूनपर्यंतच (30th June) ही ऑफर आहे. पण हे लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांसाठी आहे जे पेटीएमवरुन पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक (LPG Gass Cylinder Booking) करत आहेत. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही जर एलपीजी गॅस सिलेंडरची बुकींग करत असाल तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल. ज्याचे कॅशबॅक मूल्य 800 रुपये आहे. ही ऑफर फक्त 500 रुपयांच्या पेमेंटवरच लागू होईल. कॅशबॅकसाठी तुम्ही स्क्रॅच कार्ड (Scrach Card) उघडा आणि बिल पेमेंट (Bill payment) करा. त्यानंतरच तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कॅशबॅकची रक्कम 10 रुपये ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. तुम्हाला हे स्क्रॅचकार्ड 7 दिवसांच्या आतमध्ये उघडावे लागेल. 7 दिवसांनंतर तुम्ही त्याचा वापर करु शकणार नाही. Also Read - LPG Cylinder Prices Hike: किचनचं बजेट बिघडणार! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

अशापद्धतीने करा गॅस सिलेंडर बुक –

– सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Paytm App डाऊनलोड करा. त्यानंतर तुमच्या एजन्सीवर गॅस सिलेंडर बुक करा.

– Paytm अॅपच्या Show More यावर सर्वात आधी क्लिक करा. Rechare and pay billवर क्लिक करा.

– त्युम्हाला Book a Cylinderचा पर्याय दिसेल. यावर जाऊन तुम्हाला आपला गॅस सिलेंडर प्रोव्हाइडर क्लिक करावा लागेल.

– बुकिंगच्या आधी ‘FIRSTLPG’चा प्रोमो कोड टाकावा लागेल.

– बुकिंगच्या 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला कॅशबॅकसाठी स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड तुम्हाला 7 दिवसांच्या आतमध्ये वापरायचे आहे. 7 दिवसांनंतर ते बाद होईल.