Top Recommended Stories

LPG Price Update: एप्रिलपासून दुप्पट होऊ शकतात घरगुती गॅसच्या किमती, जाणून घ्या - काय असू शकते कारण?

LPG Price Update: सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा वाढत्या महागाईचा फटका सहन करावा लागू शकतो. त्याचा परिणाम एलपीजी ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा तुमच्या घरच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Updated: February 23, 2022 1:41 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

LPG Price Update: एप्रिलपासून दुप्पट होऊ शकतात घरगुती गॅसच्या किमती, जाणून घ्या - काय असू शकते कारण?
LPG Free Gas Connection

LPG Price Update: सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा वाढत्या महागाईचा फटका सहन करावा लागू शकतो. त्याचा परिणाम एलपीजी ग्राहकांच्या (LPG consumers) खिशावर होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा (petrol and diesel price) तुमच्या घरच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक गॅस टंचाईमुळे (Global gas shortages) एप्रिलपासून शिजवलेले अन्न खाणे महाग होऊ शकते. झी न्यूज हिंदीमधील एका रिपोर्टनुसार या जागतिक गॅस संकटाचा (global gas crisis) परिणाम लवकरच भारतातील घरगुती गॅसच्या (Gharguti Gas) किमतींवर होऊ शकतो. यामुळे एप्रिलपासून गॅसच्या कमती दुप्पट होऊ शकतात.

Also Read:

जागतिक गॅस संकट

जागतिक संकटामुळे सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योगांचा वाहतूक खर्च आणि परिचालन खर्चही वाढेल. या सर्व घटकांचा थेट फटका ग्राहकांना बसू शकतो.

You may like to read

मागणीनुसार पुरवठा नाही

रशिया त्याच्या अंतरमहाद्वीपीय पाइपलाइनद्वारे संपूर्ण युरोपमध्ये गॅसचा प्रमुख पुरवठादार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु दोन्ही देश युद्धाच्या उबरठ्यावर उभे आहेत. या संकटामुळे गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू कोविड-19 महामारीच्या प्रभावातून सावरत असताना जगभरातील वाढती ऊर्जेची मागणी विकासाला अस्थिर करू शकते.

घरगुती वस्तूंवर परिणाम

रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे युद्धाची भीती निर्माण झाली आहे. या गॅसच्या किमतीवर अनेक पटींनी परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम एप्रिलपर्यंत दिसून येईल, जेव्हा एलपीजीच्या किमतींत सुधारणा केल्या जातील. झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार विश्लेषकांनी सांगितले की किंमत 2.9 प्रति एमएमबीटीयूवरून 6-7 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 1:30 PM IST

Updated Date: February 23, 2022 1:41 PM IST