Top Recommended Stories

Maruti Suzuki WagonR 2022 : दोन नवीन इंजिन आणि नवीन फीचर्ससह येत आहे मारुतीची 'ही' कार; मायलेज 25 Kmpl पेक्षा जास्त

Maruti Suzuki WagonR 2022 : मारुती-सुझुकीने  नुकतेच सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो लॉन्च केली आहे. आता ग्राहकांच्या पसंतीची दुसरी कार वॅगन-आरचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक बदलांसह नवीन स्टाईलमध्ये ही कार येणाऱ्या काही दिवसात ग्राहकांना उपलब्ध होईल.

Updated: February 26, 2022 7:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Maruti Suzuki WagonR 2022 : दोन नवीन इंजिन आणि नवीन फीचर्ससह येत आहे मारुतीची 'ही' कार; मायलेज 25 Kmpl पेक्षा जास्त!

Maruti Suzuki WagonR 2022 : मारुती-सुझुकीने (Maruti-Suzuki)  नुकतेच सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो लॉन्च केली आहे. आता कंपनी ग्राहकांच्या पसंतीची दुसरी कार वॅगन-आरचे नवीन मॉडेल (New 2022 Maruti Suzuki WagonR)  लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक बदलांसह नवीन स्टाईलमध्ये ही कार येणाऱ्या काही दिवसांत ग्राहकांना उपलब्ध होईल. इंटरनेटवर लीक झालेल्या एका दस्ताऐवजात (brochure leaked)  या कार विषयी अनेक माहिती समोर आली आहे. त्यानुसार नव्या वॅगन-आरमध्ये 2 नवीन इंजिन आणि नवीन फीचर्स देण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

Also Read:

25 Kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळणार –

नव्या मारुती सुझुकी वॅगन-आर सोबत दोन इंजिन देण्यात आले आहे. ज्यात पहिला K10C ड्युअल जेट इंजिन आहे. जो 1.0 लिटर K10B ची जागा घेणार आहे. हे नवे इंजिन 67 बीएचपी शक्ती आणि 89 एनएम पीक टॉर्क बनविते. हे इंजिन नव्या मारुती सुझुकी सेलेरिओमधून घेण्यात आले आहे आणि आगामी नवीन एस-प्रेसोसोबत देखील दिले जाऊ शकते. यासह नवीन 1.2 लीटर ड्युअल जेट इंजिन जे 90 अश्वशक्ती क्षमतेचे असेल. कंपनी या इंजिनाला 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्स देणार आहे. नव्या इंजिनबाबत कंपनीकडून असा दावा केला जातो आहे की, हे इंजिनं 25.9Kmpl इतका मायलेज देईल.

You may like to read

हे असतील नवीन फीचर्स –

कंपनी या कारला लुक देण्यासाठी हॅचबॅकच्या बदलांसह इतर किरकोळ बदल बघायला मिळणार आहे. यात ड्युअल टोन पेंट स्कीम आणि नवीन अलॉय व्हील असेल. कारच्या इंटेरिअरमध्ये मोठा बदल असेल नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कारला पूर्वीसारखे 7.0 इंच टचस्क्रीन स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यासह सेफ्टी फीचर्समध्ये वाढ करण्यात येणार आहे. कारला ड्युअल एअर बॅग, हिल होल्ड असिस्ट, स्पीड सेन्सिटिव्ह डोअर लॉक यासह रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वार्निंग आणि सीट बेल्ट रिमाइंडर देखील मिळेल.

काय असेल किंमत? –

नवीन वॅगन-आर कारची सध्याची एक्स शोरूम किंमत 1.0 लिटरसाठी 5.18 लाख रुपये आहे. जी टॉप मॉडेलसाठी 6.58 लाख रुपयांपर्यंत जाते. नव्या मॉडेलच्या किमतीत बेलेनोच्या पार्श्वभूमीवर थोडी फार वाढ होऊ शकते. या कारसह येणाऱ्या काळात कंपनी इतर कार देखील लॉन्च करणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या