Mask Latest Guidelines: 'या' राज्यात मास्क पुन्हा अनिवार्य! अन्यथा भरावा लागेल 500 रुपये दंड
Mask Latest Guidelines: चंडीगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह सरकारी, खासगी कार्यलयात मास्क पुन्हा अनिवार्य (Chandigarh Mask Latest Guidelines) करण्यात आला आहे. मास्कविना दिसणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.

Mask Latest Guidelines: देशाच्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने पसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रसार (Covid 19) वाढत असल्याने खबरदारी म्हणून काही राज्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशात चंडीगड (Chandigarh) जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह आणि सरकारी-खासगी कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य (Chandigarh Mask Latest Guidelines) केले आहे. केंद्र शासित प्रदेशच्या प्रशासकाने जारी केलेल्या आदेशानुसार, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
Also Read:
काय आहे गाईडलाईन्स…?
सरकारी आदेशानुसार चित्रपट गृह, शॉपिंग मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर, दुकाणे, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, पुस्तकालय, सरकारी आणि खासगी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिका वाहतूक- बसेस, टॅक्सी, ऑटो रिक्षात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम त्यात धार्मिक, राजकीय मेळाव्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
हरियाणामध्ये कोरोना बूस्टर डोस मोफत…(Free Booster Dose In Haryana)
दुसरीकडे, हरियाणात मनोहर लाल खट्टर सरकारने कोरोना बूस्टर डोसबाबत (Free Booster Dose In Haryana)मोठी घोषणा केली आहे. राज्यात 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. सर्व सरकारी सेंटर्सवर कोरोना बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हरियाणा सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, राज्यात कोरोना बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बूस्टर डोसचे मुल्य 250 रुपये होते. मात्र, आता बूस्टर डोस अगदी मोफत मिळणार आहे. राज्यात 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांची संख्या जवळापास 1.2 कोटी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 300 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र, हा खर्च कोविड मदत निधीमधून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना मास्क वापरावे. हात वारंवार स्वच्छ करावे. सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा. गर्दी करू नये. कोरोनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालण करावे.
दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली राज्य सरकारने गेल्या आठवड्यात मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातही निर्बंध लागू
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) देखील कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहे. मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात गौतम बुद्ध नगर, (Gautam Buddh Nagar), गाझियाबाद (Ghaziabad), हापुड ( Hapur), मेरठ (Meerut), बुलंदशहर (Bulandshahr) आणि बागपत (Baghpat), लखनऊचा (Lucknow) समावेश आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या