Top Recommended Stories

Medical Officer Recruitment: भारतीय क्रीडा प्राधिकरणात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती, असा करा अर्ज!

Medical Officer Recruitment: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये ((Sports Authority Of India)) वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी (Medical Officer Recruitment) 27 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 27 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. संपूर्ण भारतामध्ये नोकरीची ही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियासाठी तुम्ही पात्र असाल तर तात्काळ अर्ज करा.

Published: April 24, 2022 11:03 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

IBPS Recruitment 2022
IBPS Recruitment 2022

Medical Officer Recruitment : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (Sports Authority Of India) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Recruitment) पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली होती. अर्ज करण्याची प्रक्रिया संपत आली असून अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडे फक्त दोन तीन दिवसांचा कालावधी उरला आहे.त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

Also Read:

भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी 27 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 27 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. संपूर्ण भारतामध्ये नोकरीची ही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियासाठी तुम्ही पात्र असाल तर तात्काळ अर्ज करा. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय क्रीडा प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट https://sportsauthorityofindia.gov.in/sai/ ला भेट देऊन अर्ज करु शकतात.

You may like to read

पात्रता –

भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार एमबीबीएस असावा. तसंच या उमेदवाराकडे तीन ते पाच वर्षांचा अनुभव असावा. तसंच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरीची पदवी असावी.

पदांचा तपशील –

एकूण पदं – 27
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 एप्रिल 2022 रोजी 40 वर्षांपर्यंत असावे. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,25,000 रुपयांपर्यंत प्रतिमाह पगार मिळेल.

असा करा अर्ज –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://saijobs.sportsauthorityofindia.gov.in/hplmedical/ या लिंकवर क्लिक करावे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 11:03 AM IST