Top Recommended Stories

MiG-21 Fighter Aircraft Crashed : राजस्थानमध्ये मिग-21 हे लढाऊ विमानात कोसळले, 2 पायलट शहीद!

MiG-21 Fighter Aircraft Crashed : राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मीग- 21 लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन पायलट होते. हा अपघात एवढा भीषण होता की कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला.

Published: July 29, 2022 7:05 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

MiG-21 Fighter Aircraft Crashed : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. राजस्थानातील बडमेर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (MiG-21 Fighter Aircraft Crashed) कोसळले. या विमानामध्ये दोन पायलट होते. या दुर्घटनेमध्ये दोन्ही पायलट शहीद (Pilot Martyred) झाले आहेत. गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of Inquiry) आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मीग- 21 लढाऊ विमान कोसळले. हा अपघात बारमेरच्या भीमडा गावात झाला आहे. या विमानात दोन पायलट होते. हा अपघात एवढा भीषण होता की कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे भाग अक्षरश: विखुरले गेले. अपघातानंतर मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर दूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त विमान हे हवाई दलाचे मिग-21 ट्रेनर विमान आहे.

You may like to read

हवाई दलाने एक निवेदन जारी करून सांगितले की, रात्री 9.10 वाजता हवाई दलाचे मिग-21 ट्रेनर विमान प्रशिक्षणादरम्यान पश्चिम सेक्टरमध्ये कोसळले. या अपघातात दोन्ही पायलट शहीद झाले आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दोन्ही पायलटांप्रती भारतीय वायुसेनेने तीव्र शोक व्यक्त केला आणि ते शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेशही देण्यात आले आहेत.


या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्याशी चर्चा केली आहे. हवाई दल प्रमुखांनी त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, हवाई दलाच्या मिग-21 विमान कोसळल्याची अनेक प्रकरणं याआधी समोर आली आहेत. मागच्या वर्षी बाडमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान मिग-21 विमान कोसळले होते. या अपघातात सुदैवाने पायलट बचावले होते. त्यापूर्वी 21 मे 2021 रोजी पंजाबमधील मोगा येथे मिग-21 विमान कोसळले होते. यामध्ये पायलट अभिनव शहीद झाले होते.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>