नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाचा (Union Cabinet) विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे असलेले रेल्वे खातं काढून ते माजी आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव (IAS Officer Ashwini Vaishnav) यांच्याकडे सोपवण्यात आले. अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचारी यापुढे दोन शिफ्टमध्ये काम करतील, असे आदेश त्यांनी दिले आहेत. नव्या रेल्वेमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.Also Read - Kisan Sarathi Launch: सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्म 'किसान सारथी' लॉन्च; सोप्या भाषेत मिळणार शेतीविषयक माहिती

रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी. जे. नारायण यांनी सांगितले की, ‘रेल्वे मंत्र्यांनी (Railway Minister Ashwini Vaishnav) सर्व कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये (two shifts) काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असेल आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे.’ Also Read - Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत बंपर व्हॅकन्सी, 10 वी पासही करू शकतात अर्ज

Also Read - सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत 3,378 पदांसाठी मेगा भरती, 10वी पास असणाऱ्यांनी लवकर करा अर्ज

नवीन रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचारी (Railway Workers) यापुढे रात्री 12 वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्यामुळे ते दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. तसंच, हा आदेश एमआर सेलला (मंत्री कार्यालय) लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, असं डी. जे नारायण यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दृष्टीकोणाचा एक भाग आहे. रेल्वेवर मोदींचा फोकस असून त्याबाबतची त्यांची काही स्वप्ने आहेत. ती सत्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे.’ दरम्यान, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रवीशंकर प्रसाद यांचे माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. रवीशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांच्याप्रमाणे त्यांनीही ट्विटरविरोधात (Twitter) आक्रमक भूमिका घेतली आहे.