मुंबई दहशतवादी हल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ ही लष्कर ए तय्यबाची सदस्य असल्याचा खुलासा केला आणि एकच गोंधळ उडाला. यासंदर्भात मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता या प्रकरणी सावध पवित्रा घेतला आहे. हेडलीने अद्याप काय म्हटले हे मला माहित नाही. त्याबाबत मला अगोदर जाणून घ्याव लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

डेव्हिड हेडलीनं इशरत जहाँ ही एक सुसाईड बॉम्बर होती. अशी कबुली दिल्यानंतर आजही आपण इशरतला निर्दोष मानता का? याबाबत बोलताना आव्हाड यांनी सावध पवित्रा घेत म्हणाले की, ‘हेडली नेमकं काय म्हणाला हे मला अद्याप माहित नाही. त्याबाबत मला आधी जाणुन घ्यावं लागेल. पण इशरत जहाँ विषयी मला अभ्यास करावा लागेल.’( हे पण वाचा इशरत सुसाईड बॉम्बर असल्याची हेडलीची पुन्हा कबुली)

हेडलीच्या कबुलीवरही आव्हाड यांनी संशय व्यक्त केला आहे. ‘जेव्हा इशरत जहाँ चकमकीत मारली गेली त्यावेळी हेडली ड्रग्स तस्कर होता. तोवर त्याचा लष्करशी संबंध नव्हता. म्हणूनच त्यांनं इशरतबद्दल दिलेली माहिती कितपत खरी आहे हे पाहावं लागेल. तसंच तो त्यावेळी अमेरिकेसाठीही हेरगिरी करीत होता. त्यामुळे हेडलीचा वादग्रस्त इतिहास पाहता या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल.’ असंही आव्हाड म्हणाले.