Mobile Internet Speed: असा वाढवा तुमच्या मोबाईलवरच्या इंटरनेटचा स्पीड!

Mobile Internet Speed: इंटरनेटचा स्पीड आपल्या हातात नाही, हे सर्वांना माहिती आहेच. पण अशामध्ये काही ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.

Published: February 22, 2022 6:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

कुछ ऐप्स को कर दें बंद
कुछ ऐप्स को कर दें बंद

Mobile Internet Speed : आजाकाल प्रत्येकाच्या हातात ब्रँडेड स्मार्टफोन (Smartphone) पाहायला मिळतो. स्मार्टफोन म्हटलं की प्रत्येकाचे या नाही तर त्या सोशल मीडियावर अकाऊंट (Social Media Account) असते. सध्या सोशल मीडियाचा (Social Media) मोठ्याप्रमाणात वापर वाढला आहे. युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अ‍ॅप्सचा (Social Media App) वापर केला जातो. सोशल मीडियाचा वापर आला म्हटल्यावर त्यासाठी लागते ते म्हणजे इंटरनेट (Internet). अशावेळी फक्त इंटरनेट असून उपयोग नाही. इंटरनेटचा स्पीड (Internet Speed) चांगला असणे आवश्यक आहे.

Also Read:

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (WhatsApp Message) किंवा कॉलसाठीही (Whatsapp Call) चांगले इंटरनेट स्पीडची (Internet Speed) आवश्यकता असते. अशा स्थितीत जर इंटरनेटचा स्पीड स्लो असेल तर आपली बरीच कामं खोळंबतात. अशामध्ये सोशल मीडियाचा वापर करायचा म्हटल्यावर हायस्पीड इंटरनेटची (Highspeed Internet) मागणी वाढली आहे. इंटरनेटचा स्पीड आपल्या हातात नाही, हे सर्वांना माहिती आहेच. पण अशामध्ये काही ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. या ट्रिक्स (Tricks) केवळ डिव्हाइस (Device) किंवा नेटवर्कसाठीच उपयुक्त ठरतात.

कधीकधी तुमचं इंटरनेट स्लो असण्याचे कारण तुमचं डिव्हाइस (Device) असते. कारण स्मार्टफोन (Smartphone) कमी बँडविड्थ नेटवर्क (Bandwidth network) पकडतो त्यामुळे तुम्हाला स्लो इंटरनेट मिळते. ही समस्या 3G आणि 4G दोन्ही नेटवर्कवर जाणवते. तुम्ही हाय बँडविड्थ इंटरनेटवर स्विच करून इंटरनेटचा वेग वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 – सर्वात अगोदर आपल्या स्मार्टफोन सेटिंग्जमध्ये जा.

स्टेप 2 – त्याठिकाणी मोबाइल नेटवर्क हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 – त्यानंतर तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरवर जा आणि Network ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 4 – त्याठिकाणी असलेल्या Select Automatically ऑप्शनवर क्लिक करून तो टर्न ऑफ करा.

स्टेप 5 – असं केल्यानंतर तुम्हाला मॅन्युअली तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर शोधून त्यावर टॅप करावे लागेल.

सेटिंग्जमध्ये वर दिलेले सर्व बदल केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट करावा लागेल. स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल की तुमचा मोबाईल इंटरनेट स्पीड वाढला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 22, 2022 6:00 PM IST