नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला फेरबदल (Modi Cabinet Expansion) आज संध्याकाळी करण्यात आला. या दरम्यान 43 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. नव्या मंत्रिमंडळात 15 कॅबिनेट आणि 28 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. राज्यसभेचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना सर्वात आधी पदाची व गोपनीयतेची शपथ दिली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात डॉक्टर, अभियंता, पीएचडीधारक आणि अनेक वकीलांचा समावेश आहे. नवीन मंत्रिमंडळात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातून 7 जणांना मंत्रीपद देण्यात आले आहे.Also Read - Modi Cabinet Expansion: शपथविधीपूर्वी समोर आली संभाव्य नव्या 43 मंत्र्यांची यादी; पाहा पूर्ण List

दरम्यान, फेरबदलापूर्वी अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, बाबुल सुप्रियो आणि संतोष गंगवार हे प्रमुख होते. राष्ट्रपतींनी सर्व केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देखील स्वीकारला आहे. Also Read - Modi Cabinet Expansion: PM Modi कॅबिनेटचा आज विस्तार! महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळणार संधी

या 43 मंत्र्यांनी घेतली शपथ (Full List Of Ministers)

 1.  नारायण राणे
 2.  सर्वानंत सोनोवाल
 3. डॉक्टर वीरेंद्र कुमार
 4.  ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया
 5. आरसीपी सिंह (JDU)
 6. अश्निनी वैष्णव
 7. पशुपति कुमार पारस
 8. किरेण रिजीजू
 9. राजकुमार सिंह (RK Singh)
 10. हरदीप सिंह पुरी
 11. मनसुख मंडाविया
 12. भूपेंद्र यादव
 13. पुरषोत्तम रुपाला
 14. जी किशन रेड्डी
 15. अनुराग ठाकुर
 16. पंकज चौधरी
 17. अनुप्रिया पटेल
 18.  प्रोफेसर एसपी सिंह बघेल
 19. राजीव चंद्रशेखर
 20. शोभा करांडलाजे
 21. भानु प्रताप वर्मा
 22. दर्शना विक्रम जरदोश
 23. मीनाक्षी लेखी
 24. अन्नपूर्णा देवी
 25. ए. नारायणस्वामी
 26. कौशल किशोर
 27. अजय भट्ट
 28. बीएल वर्मा
 29. अजय कुमार
 30. देवूसिंह चौहान
 31. भगवंत खुबा
 32. कपिल मोरेश्वर पाटिल
 33. प्रतिमा भौमिक
 34. डॉ. सुभाष सरकार
 35. डॉ. भागवत कराड
 36. राजकुमार रंजन सिंह
 37. डॉक्टर भारती पवार
 38. बिशेश्वर टुडू
 39. शांतनु ठाकुर
 40. मुंजपारा महेंद्र भाई
 41. जॉन बारला
 42. डॉक्टर एल मुरुगन
 43. नीशीथ प्रमाणिक

या मंत्र्यांचा घेतला राजीनामा

 1. रविशंकर प्रसाद
 2. प्रकाश जावडेकर
 3. रमेश पोखरियाल निशंक
 4. डॉक्टर हर्षवर्धन
 5. संतोष गंगवार
 6. बाबुल सुप्रियो
 7. प्रताप सारंगी
 8. संजय धोत्रे
 9. रतन लाल कटारिया
 10. सदानंद गौडा
 11. देबोश्री चौधरी
 12. थावरचंद गहलोत

दरम्यान पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोणातून मंत्रिमंडळ विस्तारात नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये राज्यांमधील भागांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. Also Read - Modi Cabinet Expansion: मोदी कॅबिनेटचा विस्तार उद्याच होणार! 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता