
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Monkeypox Virus : जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण झपाट्याने वाढत आहे. हा विषाणू (Monkeypox Virus) एका देशातून (Countries) दुसऱ्या देशात पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 50 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचे (Monkeypox Virus) संकट वाढल्याचे जाहीर केले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता WHO ने म्हटले आहे की, या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. परंतु सध्यातरी जागतिक आरोग्य (World Health) आणीबाणीची स्थिती घोषित करण्याची आवश्यकता नसल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) आपत्कालीन समितीने शनिवारी एक निवेदनाद्वारे म्हटले आहे की, या समस्येच्या अनेक असामान्य बाजू आहेत. यासह मंकीपॉक्सच्या धोक्यांकडे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केले गेल्याचे देखील समितीने मान्य केले. तसेच समितीने नमूद केले की, आता काही आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्स महामारी नाही.
यावेळी समितीच्या काही सदस्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. तथापि, समितीने WHO च्या महासंचालकांना एकमताने शिफारस करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मंकीपॉक्सची सध्याची परिस्थिती लक्षात घेता जागतिक आणीबाणीची स्थिती घोषित करू नये अशी शिफारस करण्यात आली आहे. मंकीपॉक्सचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी जलद पावले उचलण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
समितीने म्हटले आहे की, या समस्येवर लक्ष ठेवत काही आठवड्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. ज्या देशांमध्ये आधीच मंकीपॉक्सची प्रकरणे आहेत, अशा देशांमध्ये संसर्गाचा प्रसार झाल्यास, प्रकरणांची तीव्रता वाढली किंवा पसरण्याचे प्रमाण वाढले का? या परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याचेही सुचवण्यात आले आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी नुकतीच आपत्कालीन समितीची बैठक बोलावली होती. यात त्यांनी ज्या देशांमध्ये पूर्वी साथीच्या आजारांची नोंद झाली नव्हती अशा देशांमध्ये मांकीपॉक्सच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, मंकीपॉक्सची समस्या विशेषतः नवीन देश आणि प्रदेशांमध्ये वेगाने पसरत आहे. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक, गर्भवती महिला आणि मुलांसह असुरक्षित लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या