Top Recommended Stories

Monkeypox Virus : दिलासादायक! मंकीपॉक्स व्हायरसवर औषध मिळालं, रुग्ण लवकरच होणार बरा

Monkeypox Virus : मंकीपॉक्स व्हायरस या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहे. या आजारावर अँटीव्हायरल हे औषध आराम देऊ शकणार आहे. अँटीव्हायरल हे औषध मंकीपॉक्स आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरु शकतात. या औषधामुळे या आजाराची लक्षणं कमी होऊ शकतात त्यासोबतच रुग्ण लवकर बरे होण्यास देखील मदत होऊ शकते.

Published: May 26, 2022 12:20 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

monkeypox virus
monkeypox virus

Monkeypox Virus : कोरोनामुळे (Corona Virus) जगाची चिंता आधीच वाढली आहे. कोरोनाची (Covid- 19) भीती संपत नाही तोपर्यंत आणि एका नव्या व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्स व्हायरस (Monkeypox Virus) सध्या जगामध्ये चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिका (America) आणि युरोपसह (Europe) जगातील अनेक देशांमध्ये या व्हायरसचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. या व्हायरसमुळे चिंता वाढत असताना यामध्येच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडले आहे.

मंकीपॉक्स व्हायरस या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहे. या आजारावर अँटीव्हायरल हे औषध आराम देऊ शकणार आहे. अँटीव्हायरल हे औषध मंकीपॉक्स आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरु शकतात. या औषधामुळे या आजाराची लक्षणं कमी होऊ शकतात त्यासोबतच रुग्ण लवकर बरे होण्यास देखील मदत होऊ शकते. लॅन्सेटच्या अभ्यातून ही माहिती समोर आली आहे.

You may like to read

लेन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल हे औषध मंकीपॉक्स रोगापासून लवकर बरे होण्यासाठी मदत करते. त्याचसोबत ज्यांना मंकीपॉक्स झाला आहे त्या रुग्णाने हे औषध घेतले तर त्याची लक्षणे कमी करु शकतात. त्याचसोबत या रोगापासून बरे होण्यास देखील हे औषध मदत करते. हे संशोधन लिव्हरपूल युनिव्हर्सिटी एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे. हे संशोधन 2018 ते 2021 या कालावधीमध्ये युनायटेड किंगडममधील मंकीपॉक्सच्या सात रुग्णांवर करण्यात आले होते. यामधील तीन रुग्ण हे पश्चिम अफ्रिकेतून आले होते तर उर्वरित चार रुग्णांमध्ये इतरांकडून संसर्ग झाला होता.

या संशोधनादरम्यान दोन औषधांचा वापर रुग्णांवर करण्यात आला. Brincidofovir आणि Tecovirimat ही दोन औषध या रुग्णांना देण्यात आली होती. पहिल्या औषधांचा वापर करुनही रुग्णांना काहीच फरक पडला नाही. हे औषध तीन रुग्णांना देण्यात आले होते. औषध घेतल्यानंतर या रुग्णांना लिव्हरच्या एन्झाइमची पातळीही थोडीशी खालावली. हा त्रास त्यांना झाला असला तरी ते काही वेळाने बरे झाले. त्यानंतर 2021 मध्ये युनायटेड किंगडममधील एका रुग्णाला दुसरे औषध Tecovirimat देण्यात आले. हा रुग्ण लवकर बरा झाला आणि दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका कमी झाला. त्यामुळे या संशोधनातून असे लक्षात आले की, अँटीव्हायरल हे औषध मंकीपॉक्ससाठी उपयुक्त असल्याचे समोर आले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.