By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Monkeypox Virus : पालकांनो सावधान! मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आयसीएमआरचा इशारा
Monkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स आजाराने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात गेल्या 20 दिवसांमध्ये मंकीपॉक्सचा 21 देशांमध्ये प्रसार झाला आहे आणि आतापर्यंत 226 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. भारतात या संसर्गाने अद्याप एकही रुग्ण बाधित झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Monkeypox Virus : कोरोनामुळे (Corona Virus) जगावर असलेले भीतीचे सावट अद्याप दूर झाले आहे. कोरोनामुळे सर्वांची चिंता आधीच वाढली आहे. अशामध्ये आता एका नव्या व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्स व्हायरस (Monkeypox Virus) सध्या जगामध्ये चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिका (America) आणि युरोपसह (Europe) जगातील अनेक देशांमध्ये या व्हायरसचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. अशामध्ये मंकीपॉक्स आजाराचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे आपल्या देशात मुलांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून येतात का यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian ouncil of Medical Research) म्हणजेच आयसीएमआर (ICMR) या संस्थेने सांगितले आहे.
कोरोनानंतर मंकीपॉक्स आजाराने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात गेल्या 20 दिवसांमध्ये मंकीपॉक्सचा 21 देशांमध्ये प्रसार झाला आहे आणि आतापर्यंत 226 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. भारतात या संसर्गाने अद्याप एकही रुग्ण बाधित झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. पण तरी सुद्धा केंद्र सरकार (Central Government) याबाबत खूपच सतर्क आहे.
मंकीपॉक्सच्या विषाणूंमध्ये अद्याप एकही जनुकीय बदल झालेला नाही. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतरही या विषाणूंमध्ये परिवर्तन झाल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले नाही. पण अशामध्ये जगभरातील इतर देशात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढ चालल्यामुळे मंकीपॉक्सने या देशांची चिंता वाढवली आहे.
दरम्यान, मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडले आहे. मंकीपॉक्स व्हायरस या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहे. या आजारावर अँटीव्हायरल हे औषध आराम देऊ शकणार आहे. अँटीव्हायरल हे औषध मंकीपॉक्स आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरु शकतात. या औषधामुळे या आजाराची लक्षणं कमी होऊ शकतात त्यासोबतच रुग्ण लवकर बरे होण्यास देखील मदत होऊ शकते. लॅन्सेटच्या अभ्यातून ही माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या