Top Recommended Stories

Monsoon Update : आनंदवार्ता! मान्सूनचे केरळमध्ये धडाक्यात आगमन, 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

Monsoon Update : मान्सूनचे केरळमध्ये (monsoon arrives in kerala) धडाक्यामध्ये आगमन झाले आहे. नियमित वेळेपेक्षा केरळमध्ये मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) याबाबत माहिती दिली आहे.

Published: May 30, 2022 8:36 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

monsoon alert
monsoon alert

Monsoon Update : उन्हाचा पारा (Heat Wave) चढत असल्याने आणि उकाडा वाढत असल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे सर्वजण पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहत आहे. यावर्षी मान्सूनचे (Monsoon) आगमन लवकर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता पण मान्सूनचा प्रवास लांबणीवर गेला होता. पण आता उकाड्यामुळे हैराण झालेल्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मान्सूनचे केरळमध्ये (monsoon arrives in kerala) धडाक्यामध्ये आगमन झाले आहे. नियमित वेळेपेक्षा केरळमध्ये मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) याबाबत माहिती दिली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. नियमित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळसह तामिळनाडू, अंदमान, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण कर्नाटकामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यामध्ये मान्सूचे आगमन होईल. 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आधी वर्तवला होता.

You may like to read

उद्यापासून पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगत काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, 30 मेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मुख्यत्वे दक्षिण भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही, हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.