Top Recommended Stories

Motorola ने लॉन्च केला जबरदस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अनेक स्मार्ट फीचर्स.. जाणून घ्या किंमत

Motorola कंपनीने आपला नवा कोरा जबरदस्त Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. यात असलेले स्मार्ट फीचर्समुळे यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स मिळेल.

Published: February 25, 2022 1:39 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Motorola ने लॉन्च केला जबरदस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अनेक स्मार्ट फीचर्स.. जाणून घ्या किंमत

Motorola कंपनीने आपला नवा कोरा जबरदस्त Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. यात असलेले स्मार्ट फीचर्समुळे यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स मिळेल. Motorola Edge 30 Pro मध्ये 144Hz PO LED डिस्प्ले देण्यात आला आहे. 50 MP कॅमेऱ्यासोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (Motorola Smartphone) देण्यात. सोबतच 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. त्यामुळे यूजर्स स्मार्टफोन झटपट चार्ज करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया Motorola Edge 30 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

Also Read:

Motorola Edge 30 Pro: किंमत

Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 49999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Cosmos Blue आणि Stardust White कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या 4 मार्चपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. Flipkart सह इतर अनेक लीडिंग स्टोअर्समधून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

You may like to read

Motorola Edge 30 Pro: काय आहे लॉन्च ऑफर?

Motorola Edge 30 Pro च्या लॉन्चिंगसोबत कंपनीने ऑफरची घोषणा केली आहे. Flipkart वरून खरेदी केल्यास 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. याशिवाय रिटेल स्टोअर्सवरून खरेदी केल्यास यूजर्सला 5,000 रुपयांचा कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. परंतु SBI क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्या यूजर्सलाच कॅशबॅकचा लाभ घेता येईल. तसेच हा स्मार्टफोन नो कोस्ट ईएमआयवर (No Cost EMI) देखील खरेदी करता येईल.

Motorola Edge 30 Pro: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

> अँड्राइड 12 ओएसवर आधारित असून यात 6.7 इंचाचा फुल एचडी+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
> 1,080×2,400 पिक्सल रेझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट
> स्क्रीनला प्रोटेक्शनसाठी एंटी फिंगरप्रिंट कोटिंगसोबत 2.5D curved कार्निंग गोरिल्ला ग्लास 3
> flagship-level Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने अद्ययावत
> फोटोग्राफीसाठी ड्यूल एलईडी फ्लॅशसोबतच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
> प्रायमरी सेंसर 50MP, 50MP चा अल्ट्रा वाइड शूटर आणि 2MP चा डेप्थ सेंसर
– व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 60MP चा फ्रंट कॅमेरा
– पावर बॅकअपसाठी 68W TurboPower फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट सोबतच 4800mAh बॅटरी

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 25, 2022 1:39 PM IST