By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
MPSC Exam 2022: कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 9 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख!
MPSC Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती देण्यात आली आहे.

MPSC Exam 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना काळामध्ये (Covid-19) राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. याच दरम्यान आता एमपीएससी परीक्षेसाठीची कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या हजारो विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) दिलासा देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या होत्या अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या उमेदवारांनी तात्काळ अर्ज भरा.
जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022. pic.twitter.com/W58wmSzVgP
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 4, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commiss) यासंदर्भात आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, ‘1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची 9 फेब्रुवारी 2022 ही अंतिम तारीख आहे.’ अर्ज भरण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे फक्त चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळ वायाला न घालवता अर्ज करावा.
कोरोना काळात (Corona Virus) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. परीक्षा रद्द झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीची कमाल मर्यादा ओलांडली. अशामध्ये हे विद्यार्थी चिंतेत आले होते कारण कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नव्हते. पण शासनाने त्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार असून त्यांनी परीक्षेची तयार करुन तात्काळ अर्ज भरावा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या