Top Recommended Stories

National Pension Scheme: आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या योजनेत करा गुंतवणूक, मिळेल 50,000 चा आयकर लाभ

National Pension Scheme: चालू आर्धिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आयकरदात्यांनी कर बचतीचे पर्याय शोधणे गरजेचे आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी बॉडीने दिलेल्या माहितीनुसार एनपीएस म्हणजेच नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांचा विशेष टॅक्स डिडक्शन लाभ मिळेल.

Published: March 26, 2022 5:25 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

National Pension Scheme

National Pension Scheme: चालू आर्धिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आयकरदात्यांनी कर बचतीचे पर्याय शोधणे गरजेचे आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी बॉडीने (PFRDA) दिलेल्या माहितीनुसार एनपीएस (NPS) म्हणजेच नॅशनल पेंशन स्कीममध्ये (NPS Scheme) गुंतवणूक केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांचा विशेष टॅक्स डिडक्शन लाभ (Tax deduction benefits) मिळेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार (PFRDA) एनपीएसमधी गुंतवणूक 50,000 रुपयांच्या विशेष अतिरिक्त कर लाभासह अधिक फायदेशीर ठरते.

भारत सरकारने पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची (PFRDA) स्थापना नॅशनल पेंशन योजना (Pension scheme) आणि इतर कोणत्याही पेन्शन योजनेचे नियमन करण्यासाठी केली आहे. पीएफआरडीए इतर कोणत्याही कायद्याद्वारे नियंत्रित नाही. (Invest in National Pension Scheme before the end of financial year, get income tax benefit of Rs. 50,000)

You may like to read

एनपीएस आयकर लाभ (NPS income tax benefits)

  • गुंतवणूकदार एनपीएसमध्ये (Investment scheme) विविध प्रकारच्या सवलीतींचा लाभ घेऊ शकतात.
  • मुदतपूर्तीच्या वेळी गुंतवणूकदार कर सवलतीचा लाभ (Income tax benefit) घेऊ शकतात.
  • या योजनेत जमा झालेल्या रकमेला देखील आयकरातूनही सूट मिळते.
  • गुंतवणुकीच्या वेळी कोणीही आयकर सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
  • एनपीएस ही एक स्वैच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना आहे.
  • या योजनेसाठी अर्ज दाखल केल्याच्या तारखेनुसार अर्जदाराचे वय 18-70 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराने विहित केवायसी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • चांगला परतावा मिळविण्यासाठी अर्जदाराला स्वतःच्या गुंतवणुकीचा पर्याय मिळतो.
  • अर्जदाराकडे पेन्शन फंड निवडण्याचा किंवा ऑटो पर्याय निवडण्याचा पर्याय असतो.
  • अर्जदार त्यांचे खाते देशात कोठूनही ऑपरेट करू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.