Top Recommended Stories

सीनियर सिटीजन्ससाठी महत्त्वाची माहिती! NPS चे नियम बदलले, आता 75 वर्षापर्यंत मिळणार पेन्शन

सीनियर सिटीजन्ससाठी (Senior Citizen) महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या ( NPS) नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे सीनियर सिटीजन्सना मोठा फायदा होणार आहे. NPS ही सरकारकडून (PM Narendra Modi) चालवली जाणारी एक शानदार योजना (Pension Scheme) आहे.

Published: February 7, 2022 2:36 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

7th Pay Commission Latest News
7th Pay Commission: The move from the Chhattisgarh government will benefit around 3.80 lakh state government employees.

National Pension System: सीनियर सिटीजन्ससाठी (Senior Citizen) महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या ( NPS) नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे सीनियर सिटीजन्सना मोठा फायदा होणार आहे. NPS ही सरकारकडून (PM Narendra Modi) चालवली जाणारी एक शानदार योजना (Pension Scheme) आहे. ही योजना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी त्यात वेळेनुसार बदल केले जातात.

Also Read:

आता वयोवृद्ध नागरिकांना जास्त पेंशन मिळू शकेल यासाठी PFRDA ने नियमांमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार काही बदल करण्यात आले आहेत. आता 75 वर्षांपर्यत पेन्शन मिळणार आहे.

You may like to read

1. एनपीएसमधील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल

NPS मध्ये गुंतवणुकीचे कमाल वय 70 वर्षे करण्यात आले आहे. म्हणजेच 70 वर्षांपर्यंतची व्यक्ती एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकते.

2. खाते 75 वर्षे लागू राहील

PFRDA ने 60 वर्षांनंतर NPS मध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांना देखील मोठा दिलासा दिला आहे. ते आता वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत NPS खाते सुरू ठेवू शकतात. इतर सर्व सदस्यांसाठी मॅच्युरिटीची मर्यादा 70 वर्षे आहे.

3. 60 वर्षांवरील लोकांना NPS मध्ये स्वारस्य

PFRDA नुसार, NPS मध्ये प्रवेशाची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आल्यानंतर साडेतीन वर्षांत 15 हजार सदस्यांनी NPS मध्ये खाते उघडले आहे. विशेष म्हणजे सगळ्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. PFRDA चे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय सांगितले की, त्यामुळे आम्ही कमाल वयोमर्यादा आणखी वाढवण्याचा विचार करत आहोत.

4. काढू शकतात 5 लाख!

याशिवाय PFRDA ने सांगितले, की पेंशन फंडात 5 लाख रुपयांहून कमी आहे, ती संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकेल. आतापर्यंत केवळ 2 लाख रुपयांपेक्षा कमी पेंशन फंड काढण्याची मर्यादा होती. विशेष म्हणजे पेंशन फंड टॅक्स फ्री असेल. PFRDA ने चालू आर्थिक वर्षात NPS मध्ये 10 लाख नव्या सदस्यांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी NPS ने 6 लाख नवे सदस्यांनी नोंदणी केली. NPS आणि अटल पेंशन योजनेत (APY) 1 कोटी नवे सदस्या जोडण्याची अपेक्षा आहे.

5. खात्रीशीर परतावा असलेली उत्पादने NPS अंतर्गत येतील

PFRDA ने NPS अंतर्गत खात्रीशीर परताव्यासह उत्पादने देखील सादर केली आहेत. सध्या, NPS मध्ये योगदानाची प्रणाली परिभाषित केली आहे, म्हणजेच पेन्शन NPS पेन्शन फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 2:36 PM IST