NEET UG 2021 Registration: अशी करा NEET UG साठी नोंदणी, पहा वेळापत्रक, कागदपत्रे आणि महत्त्वाचे तपशील
नीट यूजी काउंसलिंग 2022 साठी रजिस्ट्रेशन आजपासून (19 जानेवारी, 2022) सुरू झाली आहे. ऑनलाइन काउंसलिंग फेरीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार mcc.nic.in या वैद्यकीय काउंसलिंग समितीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात.

NEET UG 2021 Registration: नीट यूजी काउंसलिंग 2022 साठी रजिस्ट्रेशन आजपासून (19 जानेवारी, 2022) सुरू झाली आहे. ऑनलाइन काउंसलिंग फेरीसाठी (NEET UG Counseling 2021) अर्ज करू इच्छिणारे उमेदवार mcc.nic.in या वैद्यकीय काउंसलिंग समितीच्या (MCC) अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 24 जानेवारी 2022 आहे. उमेदवार ऑनलाइन नोंदणी कशी करावी, त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे हवे आणि समुपदेशन वेळापत्रक खाली पाहू शकतात.
Also Read:
MCC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार NEET UG प्रवेशासाठी (NEET UG Admission 2021) काउंसलिंग चार फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाईल. यामध्ये दोन नियमित फेऱ्या, मॉप-अप समुपदेशन आणि एक ऑल इंडिया कोटा (AIQ) स्ट्रे व्हेकन्सीचा समावेश आहे. यावेळी 15 टक्के ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी प्रवेश नवीन EWS, OBC आरक्षणाचे मानदंड लक्षात घेऊन केले जातील.
NEET UG 2021 Online Registration Form: जाणून घ्या नोंदणी कशी करायची?
- सर्वप्रथम MCC ची अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट द्या
- त्यानंतर तेथे NEET UG Counseling 2021 वर क्लिक करा.
- मुख्यपृष्ठाच्या तळाशी स्क्रोल करा आणि ‘नोंदणी फॉर्म भरा’ वर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज भरा, अर्ज क्रमांक नोंदवा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जदारांना विहित मोड किंवा फॉरमॅटनुसार फी भरावी लागेल.
- फी भरल्यानंतर पृष्ठावरील पावतीची प्रिंटआउट काढा.
NEET UG 2022 ची पहिली फेरी
चॉइस फिलिंग लिंक 20 जानेवारी रोजी अॅक्टिव्ह केली जाईल. उमेदवार 24 जानेवारी 2022 पर्यंत चॉइस फिलिंग करू शकतात. 25 जानेवारी ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत संबंधित विद्यापीठे किंवा संस्थांद्वारे पडताळणी प्रक्रिया आणि 27 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान जागा वाटप प्रक्रिया केली जाईल. 29 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल आणि 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत रिपोर्टिंग कालावधी असेल. संपूर्ण काउंसलिंग वेळापत्रक पाहण्यासाठी या https://mcc.nic.in/WebinfoUG/File/ViewFile?FileId=4483&LangId= लिंकवर क्लिक करा.
NEET UG 2021 Online Registration: आवश्यक कागदपत्रे
NEET UG काउंसलिंग 2021 साठी नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- NEET UG 2021 स्कोअर कार्ड
- नीट यूजी 2021 प्रवेशपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी, 12वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र)
- आयडी प्रूफ (आधार/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट)
- पासपोर्ट आकाराचे 8 फोटो
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
NEET UG 2021 महत्त्वाच्या वेबसाइट्स
मेडिकलचे विद्यार्थी NEET संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी या वेबसाइटवर लक्ष ठेवू शकतात.
- amcc.nic.in,
- nta.ac.in,
- neet.nta.nic.in
- ntaneet.nic.in
नीट यूजी वैद्यकीय जागा
NEET UG 2021 स्कोअरद्वारे 83,075 एमबीबीएस, 26,949 बीडीएस, 52,720 आयुष आणि 525 बीव्हीएससी आणि एएच, 1899 एम्स आणि 249 जिपमर जागांवर प्रवेश दिला जाईल. शिवाय या वर्षापासून बीसी नर्सिंग आणि बीएससी लाईफ सायन्सेसच्या प्रवेशासाठी NEET प्रवेश परीक्षेचे गुण देखील वापरले जातील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या