Top Recommended Stories

NEET UG Counselling 2021: नीट यूजी काउंसलिंग AIQ आणि स्टेट कोट्याचे वेळापत्रक जाहीर

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रांस टेस्‍ट 2021 चे काउंसलिंग वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑल इंडिया कोट्याअंतर्गत येणाऱ्या जागांसाठी आणि राज्य कोट्यातील प्रवेशासाठी काउंसलिंगआणि प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Published: January 17, 2022 8:24 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

NEET UG Counselling 2021: नीट यूजी काउंसलिंग AIQ आणि स्टेट कोट्याचे वेळापत्रक जाहीर
NEET UG Counseling 2021 Neet UG Counseling AIQ and State Quota Schedule Announced on mcc.nic.in

NEET UG Counselling 2021: नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रांस टेस्‍टचे (NEET UG 2021) काउंसलिंग वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑल इंडिया कोट्याअंतर्गत येणाऱ्या जागांसाठी (AIQ Quota Counseling Schedule) आणि राज्य कोट्यातील प्रवेशासाठी काउंसलिंग (State Quota Counseling Schedule) आणि प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय काउंसलिंग समिती एमसीसीने आपल्या mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक जारी केले आहे. NEET UG 2021 AIQ काउंसलिंग ची पहिली फेरी 19 जानेवारीपासून सुरू होईल आणि राज्य कोट्यासाठी 27 जानेवारी 2022 पासून पहिली फेरी सुरू होईल. NEET UG उमेदवार खाली MCC NEET काउंसलिंगचे वेळापत्रक ( NEET UG Counselling 2021 Schedule) तपासू शकतात.

NEET UG 2021 अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश (NEET UG Counselling 2021) घेण्यासाठी 8 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET काउंसलिंग 2021 च्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. NEET UG काउंसलिंग 2021 साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी NEET UG 2021 स्कोअर कार्ड, NEET UG 2021 प्रवेशपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास) यासारखी आणि इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांना MCC NEET काउंसलिंग तपशील आणि इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

You may like to read

NEET UG Counselling 2021: AIQ चे वेळापत्रक

NEET UG काउंसलिंगची पहिली फेरी: 19 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख : 4 फेब्रुवारी 2022
NEET UG काउंसलिंगची दुसरी फेरी : 9 फेब्रुवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख : 26 फेब्रुवारी 2022
मॉप अप राउंड: 2 मार्च 2022 ते 11 मार्च 2022
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 19 मार्च 2022

NEET UG Counselling 2021: स्टेट कोट्याचे वेळापत्रक

NEET UG काउंसलिंगची पहिली फेरी: 27 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 7 फेब्रुवारी 2022
NEET UG काउंसलिंगची दुसरी फेरी: 15 फेब्रुवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 24 फेब्रुवारी 2022
मॉप अप राउंड: 7 मार्च 2022 ते 10 मार्च 2022
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 15 मार्च 2022

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 17, 2022 8:24 PM IST