NEET UG Counselling 2021 Dates: जाणून घ्या कधी जारी होणार नीट यूजी काउंसलिंग 2021 साठी तारीख

मेडिकलचे विद्यार्थी NEET Counselling 2021 ची वाट पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पीजी समुपदेशनाची तारीख जाहीर केली आहे.

Published: January 11, 2022 3:53 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

NEET UG Result 2022 Latest Update
NEET UG 2022: This year, nearly 95% attendance was recorded in the medical entrance exam.

NEET UG Counselling 2021 Dates: नॅशनल एजिलिबिलिटी कम एन्ट्रंस टेस्‍ट म्हणजेच NEET UG साठी काउंसलिंगची तारीख (NEET UG Counselling 2021 Date) लवकरच जारी केली जाऊ शकते. MCC ची अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर ही तारीख प्रसिद्ध केली जाऊ शकते. NEET UG 2021 च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना काउंसलिंगच्या माध्यामातून वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाटप केल्या जातील. मेडिकल काउंसलिंग कमिटी (MCC) ऑल इंडिया कोटा (AIQ) अंतर्गत येणाऱ्या 15% जागांसाठी ऑनलाइन काउंसलिंग करेल. याच्या आधारावर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

Also Read:

MBBS कोर्ससाठी एकूण 192 सरकारी महाविद्यालये आहेत जे 4129 ऑल इंडिया कोटा (AIQ seats) जागा देतात. या सर्व जागा राज्यांद्वारे ऑफर केलेल्या एकूण जागांच्या 15% आहेत. उमेदवारांना MCC च्या माध्यमातून या AIQ जागांवर प्रवेश मिळतो आणि उर्वरित 85% राज्य कोट्यातील जागांसाठी राज्यांकडून काउंसलिंग प्रक्रिया आयोजित केली जाते आणि यासाठी त्यांचे संबंधित पात्रता निकष असतात.

राज्य कोट्याअंतर्गत एकूण 192 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि त्यामध्ये 23,378 एमबीबीएसच्या जागा आहेत. 272 सरकारी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या 41,388 आहे. एमबीबीएससाठी 83,075, BDS साठी 26,949, आयुषसाठी 52,720, BVSC आणि AH साठी 603, AIIMS साठी 1,899 आणि JIPMER साठी 249 जागा उपलब्ध आहेत.

MCC ने NEET काउंसलिंग 2021 मधील बदलांबाबत एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसनुसार NEET काउंसलिंग 15% नीट यूजी जागां आणि 50% नीट पीजी जागांसाठी चार राउंडमध्ये केले जाईल. AIQ राउंड 1, AIQ राउंड 2, AIQ मॉप अप आणि AIQ स्ट्रे व्हॅकन्सी असे चार राऊंड आयोजित केले जातील.

मेडिकलचे विद्यार्थी NEET Counselling 2021 ची वाट पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पीजी समुपदेशनाची तारीख (NEET PG Counselling Date) जाहीर केली आहे. NEET PG काउंस‍लिंग 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र नीट यूजी काउंस‍लिंगच्या (NEET UG Counselling dates) तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्याची तारीखही लवकरच जाहीर होईलअशी अपेक्षा आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 3:53 PM IST