Subhash Chandra Bose Jayanti 2022 : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींचा मोलाचा वाटा, जाणून घ्या सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी रंजक गोष्टी!
Subhash Chandra Bose Jayanti 2022 : स्वातंत्र सेनानी सुभाष चंद्र बोसच्या सन्मानार्थ यंदापासून भारत सरकारने 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन पर्व साजरा करण्याचा निर्णय घेतला

Subhash Chandra Bose Jayanti 2022 : भारताचे थोर स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची आज 23 जानेवारी 2022 रोजी 124 वी जयंती आहे. एक वीर योद्धा, महान सेनापती आणि कुशल राजनेता असलेल्या या स्वातंत्र सेनानीच्या सन्मानार्थ यंदापासून भारत सरकारने (Government Of India) 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन (Republic day) पर्व साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नेताजींना ही मोठी श्रध्दांजली ठरणार आहे. अशा या नेत्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया….
Also Read:
- Electric Vehicles Ban: 'या' देशात इलेक्ट्रिक वाहनांवर घातली जाऊ शकते बंदी, पण का?
- Thailand Mass Shooting : थायलंडमध्ये हादरवून टाकणारी घटना! पाळणाघरात अंदाधुंद गोळीबार, 22 बालकांसह 34 जणांचा मृत्यू
- Kartavya Path Inauguration : पंतप्रधान मोदी आज करणार 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन, असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
आझाद हिंद सेनेसह आझाद हिंद बँकेची स्थापना (Azad hind Sena)-
पारतंत्राच्या काळात भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना करत आझाद हिंद सेना गठीत केली. याच वेळी त्यांनी आझाद हिंद बँकेची देखील स्थापना केली होती. या बँकेला दहा देशांनी समर्थन दिले होते. यात बर्मा (म्यानमार), क्रोसिया, जर्मनी, नानकिंग (सध्याचे चीन), इटली, थायलंड, मंचुको, फिलिपिन्स, आयर्लंड या देशांचा समावेश आहे. या देशांनी आझाद हिंद बँकेच्या चलनाला देखील मान्यता दिली होती. सैन्याचे गठन केल्यानंतर सर्वात आधी नेताजी सुभाष चंद्र बोस हे म्यानमारला गेले होते. याठिकाणी त्यांनी “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा !” ही घोषणा दिली.
असं होत नेताजींचे बालपण आणि शिक्षण –
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897मध्ये ओडिसा राज्यातील कटक येथील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांना 7 भाऊ, 6 बहिणी होत्या. त्यांच्या आई प्रभावती देवी आणि वडील जानकीनाथ बोस यांचे ते 9वा मुलगा होते. सुभाष चंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण काटक येथील रेवेंशॉ स्कूल येथे झाले. 1913 मध्ये पुढच्या शिक्षणासाठी ते कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले. याठिकाणी ते 1915 इंटरमीडिएटची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाले. त्यांनी प्रशासनिक सेवेत जावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यानुसार पुढील तयारीसाठी त्यांना इंग्लड येथे पाठविण्यात आले होते.
प्रशासनिक सेवेत चौथे स्थान –
इंग्रजांच्या काळात भारतींना कुठल्याही परीक्षेत पास होणे कठीण होते. अशा परिस्थितीत नेताजी यांनी भारतीय प्रशासनिक सेवेची परीक्षा देत चौथे स्थान मिळविले होते. सुरुवातीचे काही दिवस पद सांभाळल्यानंतर भारताची स्थिती आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी नोकरी सोडत भारतात परतले. याठिकाणी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जुळले. मात्र नेताजी आणि महात्मा गांधी यांचे विचार कधी जुडले नाही. असे असले तरी दोघांचे ध्यैय एकच होते ते म्हणजे भारताचे स्वतंत्र.
इंग्रजांनी केले होते नजरकैद –
सन 1938 मध्ये सुभाष चंद्र बोस यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग स्थापन केले होते. काही कालावधीनंतर त्यांनी काँग्रेस सोडत इंग्रजांच्या विरोधात लढाई तीव्र केली होती. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना घरात नजरकैद केले होते. याच वेळी दुसरे महायुद्ध सुरु होते.
मृत्यूचं गूढ अद्याप कायम –
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची ताकद वाढत असताना अचानक 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचे निधन झाले. असे म्हणतात की, मंचुरिया जात असताना त्यांचे विमान बेपत्ता झाले. आजतागायत हे समजू शकले नाही की, सुभाष चंद्र बोस यांच्या जहाजाचे काय झाले? ते कुठं गेलं?
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या