Guidelines For International Arrivals: विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता नवे नियम, 7 दिवस होम क्वारंटाइन तर...
आता विदेशातून देशात आलेल्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

New Guidelines for International Arrivals in India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) विस्फोट झाला आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या (Covid-19 Latest Update) 1 लाखांवर पोहोचली. देशात कोरोना संसर्ग दर 7.74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर ओमिक्रॉनच्या (Omicronvirus) रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अशातच ओमिक्रॉनने देशात दुसरा बळी (Omicron Second Death in India) घेतला आहे. ओडिशात 55 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. एका 55 वर्षांच्या महिलेचा ओडिशाच्या बोलांगीरमध्ये मृत्यू झाला. यापूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथे ओमिक्रॉनमुळे 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (New Guidelines for International Arrivals in India) जारी केली आहेत.
Also Read:
केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, नवे नियम 11 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे. आता विदेशातून देशात आलेल्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना आठव्या दिवशी RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे.
COVID19 | All international arrivals to undergo 7-day mandatory home quarantine: Government of India pic.twitter.com/XR7nHcmr9T
— ANI (@ANI) January 7, 2022
…तर होणार कायदेशीर कारवाई!
– आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांचा निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट अपलोड करावा लागेल.
– प्रवासाच्या 72 तास आधी केलेली कोरोना टेस्ट वैध असेल.
– कोरोना टेस्टचा रिपोर्ट खोटा असल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रवाशांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार
दरम्यान, गेल्या सात महिन्यात देशात गुरुवारी पहिल्यांदा कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. देशात रुग्णांची वाढती संख्या पाहाता कोरोना व्हायरसची (Corona Virus) तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि देशातील इतर राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्गा आणखी वाढ होण्याची भीती नाकारता येत नाही. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (New Guidelines for International Arrivals in India) जारी केली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 17 हजार 100 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 71 हजार 363 झाली आहे. ही संख्या भारतात आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी 1 टक्के आहे. भारतातील कोरोनामधून बरे होण्याचा दर 97.57 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत 30 हजार 836 बाधित लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या