Covid-19पासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नवीन गाइडलाइन्स, जाणून घ्या कशी घ्यायची स्वत:ची काळजी!
Covid-19 New Guidelines : कोविड-19 पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर लस हा सर्वोत्तम मार्ग आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona Virus) डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Covid- 19) प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

Covid-19 New Guidelines : देशात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona Virus) डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Covid- 19) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहे दिवसेंदिवस रुग्णांची (Corona Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे 1 लाख 80 हजार रुग्ण आढळले आहेत. देशामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट (Corona Positive Rate) 13 टक्क्यांवर पोहचला आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात 4 हजारांपेक्षा जास्त ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवीन रुग्ण आढळले असून 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या (Ministry of Health issues new guidelines) आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत….
Also Read:
कोविड-19चा संसर्ग रोखण्याचे दोन मार्ग –
1. लस अत्यंत महत्वाची (Vaccines are extremely important) –
जर तुम्हाला कोविड-19 पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर लस हा सर्वोत्तम मार्ग आहे. आरोग्य मंत्रालयाचे (Ministry of Health) म्हणणे आहे की, लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतात जे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरतात. लस (Corona Vaccine) शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला कोरोना संसर्गापासून दूर ठेवते. लसीकरणानंतर (Vaccination) तुम्हाला कोरोना झाला तर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही, उलट तुम्ही आयसोलेशनमध्ये (Isolation) राहून स्वत:चा बचाव करू शकता.
2. मास्कचा वापर आवश्यक (Mask must be used) –
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला आहे की, तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे (social distance) पालन करा आणि मास्क (Mask) लावायला विसरू नका. खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करा. तसंच आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, तुम्ही कोविड-19 शी संबंधित सर्व अफवा टाळा आणि तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. वेळोवेळी हात धुवा आणि बाहेरील कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
– होम आयसोलेशनमध्ये तुम्हाला इतर सदस्यांपासून अंतर ठेवावे लागेल आणि ट्रिपल लेयर मास्क वापरावा लागेल.
– जर तुम्हाला तीन दिवस सतत ताप येत नसेल आणि होम आयसोलेशनचे 7 दिवस पूर्ण झाले असतील, तर तुमचे होम आयसोलेशन संपेल.
– आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जर तुम्हाला ताप नसेल तर तुम्हाला पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही आणि याचा अर्थ तुम्ही कोविड-19 पॉझिटिव्ह नाही.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या