By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
New Labour Code : दिलासादायक! नव्या कामगार कायद्यानुसार आता नोकरी सोडल्यानंतर फक्त 2 दिवसांत मिळणार फुल अँड फायनलचे पैसे!
New Labour Code : सध्याच्या कायद्यानुसार फुल अँड फायनल पेमेंट (Full And Final Payment) 45 ते 60 दिवसामध्ये मिळत होता. आता नवीन कायद्यानुसार त्यांना अवघ्या दोन दिवसात ही सर्व रक्कम मिळणार आहे.

New Labour Code : नवीन कामगार कायद्यामुळे (New Labour Code ) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण नवीन कामगार कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. नवीन कामगार कायद्यानुसार (New Labor Code) कंपनीला आता नोकरी सोडल्यानंतर (Leaving The Job) कर्मचाऱ्यांना फक्त दोन दिवसांत फुल अँड फायनलचे पैसे द्यावे लागणार आहेत. याचा फायदा आता कर्मचाऱ्यांना होणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार फुल अँड फायनल पेमेंट (Full And Final Payment) 45 ते 60 दिवसामध्ये मिळत होता. आता नवीन कायद्यानुसार त्यांना अवघ्या दोन दिवसात ही सर्व रक्कम मिळणार आहे.
सध्या 45 ते 60 दिवसांत मिळतात पैसे –
नवीन कामगार कायदा जुलै महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. या कायद्याची अंमलबजावणी सर्व कर्मचाऱ्यांवर लक्षणीय परिणाम करणार आहे. या नवीन कामगार कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर कंपनीला जे काही देणे असेल त्यात पगार असो किंवा काही थकबाकी ते पूर्ण पैसे दोन दिवसांत द्यावे लागणार आहे. सध्याच्या कामगार कायद्यानुसार कंपनी ही रक्कम 45 ते 60 दिवसामध्ये देत आहे.
इन-हँड पगार कमी होणार –
नवीन कामगार कायद्यामध्ये कर्मचार्यांच्या हितासाठी इतरही अनेक गोष्टी आहेत, यामध्ये त्यांचे पगार, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे इन-हँड पगार कमी होणार असले तरी पीएफमधील योगदान मात्र वाढणार आहे. वाढीव योगदान केवळ कर्मचार्यांच्या बाजूने असेल, परंतु कंपनी कर्मचार्यांच्या खात्यातही तेवढीच रक्कम जमा करेल, असे या कायद्यामध्ये नमूद केले आहे.
Trending Now
आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी –
कामगारांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागणार आहे. पण दिवसातील कामाचे तास 9 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढवले जाणार आहेत. कंपनीने जर 12 तासांच्या कामाची शिफ्ट लागू केली तर कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी द्यावी लागणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे. म्हत्वाचे म्हणजे या 12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना दिवसातून दोनदा अर्ध्या तासाची सुट्टी मिळणार आहे.
वार्षीक सुट्ट्यांमध्ये बदल –
महत्वाचे म्हणजे, नव्या कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही तर्कसंगत करण्यात आल्या आहेत. नवीन कामगार कायद्यांनुसार, कर्मचाऱ्यांना दरवर्षी सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेता येणार आहेत. आता कर्मचाऱ्यांना कंपनी सोडल्यानंतरच शिल्लक सुट्ट्यावर पैसे मिळतात.
पीएफमध्ये सुद्धा झाला हा बदल –
नव्या कामगार कायद्यात कामगारांचे मूळ वेतन म्हणजेच तुमची बेसीक सॅलरी एकूण पगाराच्या किमान 50 टक्के ठेवण्याची तरतूद केली जाऊ शकते. यामुळे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमध्ये मालक आणि कर्मचारी यांचे योगदान वाढेल. पण यामुळे टेक होम सॅलरी कमी होईल. याचाच अर्थ दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पैसे येतील. नवीन कायद्यांनुसार निवृत्तीनंतर मिळणारी एकरकमी रक्कम आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या