Top Recommended Stories

Nitin Gadkari Car: नितीन गडकरी अनोख्या कारमधून पोहोचले संसदेत, जाणून घ्या काय आहे कारचे वैशिष्ट्ये

Nitin Gadkari Car: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून वाचवण्यासाठी एक अनोखा फॉर्म्युला घेऊन संसदेत पोहोचले. ते संसदेसमोर दाखल होताच लोकांच्या नजरा गडकरींच्या कारवर खिळल्या.

Updated: March 30, 2022 2:31 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Nitin Gadkari Car: नितीन गडकरी अनोख्या कारमधून पोहोचले संसदेत, जाणून घ्या काय आहे कारचे वैशिष्ट्ये
Nitin Gadkari Car

Nitin Gadkari Car: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol Diesel Price Hike) वाचवण्यासाठी एक अनोखा फॉर्म्युला घेऊन संसदेत पोहोचले. ते संसदेसमोर दाखल होताच लोकांच्या नजरा गडकरींच्या कारवर खिळल्या. खरंतर गडकरी (Nitin Gadkari) आज ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून (Green Hydrogen Car) संसदेत दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर (Petrol Diesel Gas Price) सातत्याने वाढत आहेत. आपण ते आयात करतो आणि पेट्रोल-डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होते. त्यामुळे पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे (Atmanitrbhar Bharat) स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेलाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हायला हवे असे ते म्हणाले.

You may like to read

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी देशातील पहिली कार (Hydrogen based Fuel Cell Electric car) टोयोटा मिराईचे (Toyota Mirai) लॉन्चिग करण्यात आले. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर (Toyota-Kirloskar) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. ही कार अतिशय अद्वितीय तंत्रज्ञानावर आधारित आहे. गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या या स्पेशल कारने 1300 किमीचे अंतर कापले आहे. जपानी भाषेत मिराईचा अर्थ भविष्य असा होतो. याच अर्थावरून या कारचे नाव ठेवण्यात आले आहे. या कारबाबत माहिती देताना गडकरी म्हणाले की “हे वाहन लवकरच भारतात येणार असून देशात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे आयात कमी होईल आणि आत्मनिर्भर भारताचे आमचे स्वप्न नक्कीच साकार होईल”.

यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, आरके सिंग, महेंद्र नाथ पांडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे ​​एमडी मसाकाजू योशिमुरा, टीकेएम लिमिटेडचे ​​व्हीसी विक्रम किर्लोस्कर आणि अधिकारीही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की “हा एक महत्त्वाचा पुढाकार आहे. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणार आहे आणि स्वच्छ ऊर्जा व पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन मिळेल. तसेच भारताला 2047 पर्यंत ‘ऊर्जा आत्मनिर्भर’ बनवेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.