Booster Doseसाठी नव्याने नोंदणीची आवश्यकता नाही, थेट लसीकरण केंद्रात जाऊन घ्या लस!

बूस्टर डोससाठी CoWin अ‍ॅपवर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

Updated: January 8, 2022 3:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Booster Dose
Booster Dose

Booster Dose : देशात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉन (Omicron) सुद्धा चिंतेत वाढवली आहे. ओमिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी जगातील इतर देशांप्रमाणे भारतात सुद्धा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. येत्या 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या बूस्टर डोससाठी CoWin अ‍ॅपवर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.’

Also Read:

आरोग्य कर्मचारी (Health Wokers), फ्रंटलाईन वर्कर (Frontline worker) तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना (Citizens above 60 years) बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत सांगितले की, ‘यासंदर्भातील ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शुक्रवारपासून सुरू झाली असून शेड्युल आज 8 जानेवारी रोजी प्रकाशित केले जाणार आहे. ऑनसाइट अपॉइंटमेंटसह लसीकरण 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.’

बूस्टर डोससंदर्भातील नियमावली –

– येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

– आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील या सर्वांना दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असल्यास ते तिसऱ्या डोससाठी पात्र असतील.

– 60 वर्षांवरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.

– या सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लस विनामूल्य देण्यात येणार आहे.

– वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस मिळेल.

– कोरोना प्रतिबंधक ज्या लसीचे दोन डोस तुम्ही घेतले असतील तीच लस बूस्टर डोससाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच जर तुम्ही कोव्हॅक्सिन लसीचे पहिले दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच देण्यात येईल. त्याचप्रमाणे कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोस कोव्हिशिल्ड लसीचाच दिला जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 3:34 PM IST

Updated Date: January 8, 2022 3:34 PM IST