NPS Retirement Planning : तुम्ही लक्षाधीश म्हणून निवृत्त होऊ इच्छिता का? मग अशा प्रकारे करा गुंतवणूक, महिन्याकाठी खात्यावर येतील 50000 रुपये
NPS Retirement Planning : नियमित गुंतवणूक आणि योग्य योजना निवडणे ही बाब बचतीसाठी महत्त्वाची आहे. त्यानुसार NPS ही अशी योजना आहे जी तुम्हाला निवृत्तीनंतर 50,000 पेन्शन मिळवून देवू शकते.

NPS Retirement Planning : तुम्हाला जर तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल आणि म्हातारपणात तुम्हाला पैशाची अडचण येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही आधीच नियोजन (Best Pension Plan) करायला हवे. तुमची नोकरी सुरू होईल, त्या दिवसापासूनच तुम्ही पैसे वाचवायला (Saving Plan) सुरुवात केली पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर बचत करायला सुरुवात कराल तितकेच जास्त पैसे तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत (Retirement Planning) मिळतील. यासाठी तुमच्याकडे EPF, NPS, स्टॉक मार्केट (Stock Market), म्युच्युअल फंड (Mutual Fund), रिअल इस्टेट (Real Estate) आदी गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका गुतंवणुकीबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर तुमचा वृद्धापकाळ सुरक्षित ठेवता येईल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ती योजना.
Also Read:
NPS निवृत्ती नियोजन
EPF, NPS, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट या सर्वांमध्ये NPS हा एक असा पर्याय आहे जो जास्त सुरक्षित आहे तसेच चांगला परतावा देतो. आम्ही तुम्हाला नवीन पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS द्वारे दरमहा 50,000 रुपये पेन्शनची व्यवस्था कशी करू शकता हे सांगणार आहोत. त्यानुसार समजा तुम्ही आता 30 वर्षांचे आहात. आज तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवल्यास. निवृत्तीपर्यंत म्हणजेच 30 वर्षांनी तुम्ही 60 वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्या हातात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम असेल आणि दरमहा 50 हजार रुपये पेन्शन येईल, ते वेगळे. म्हणजेच तुमचे म्हातारपण कोणावरही अवलंबून राहणार नाही.
अशी आहे NPS गुंतवणूक
तुमचे वय – 30 वर्ष
निवृत्तीचं वय – 60 वर्ष
दरमहा गुंतवणूक – 10,000
अनुमानित परतावा – 9 टक्के
एन्युटी कालावधी – 20 वर्ष
एन्युटी योजनेत गुंतवणूक – 40 वर्षे
एन्युटीवर परतावा – 6 टक्के
NPS वर सरकारकडून हमी देण्यात येते. त्यानुसार तुम्हाला वार्षिक 9 ते 12 टक्के परतावा मिळतो. मॅच्युरिटीवर तुम्हाला 40% रक्कम वार्षिकी योजनेत गुंतवावी लागते. जेणेकरून तुम्हाला नियमित पेन्शन मिळू शकेल. यात वार्षिकी परतावा देखील 6% च्या जवळ आहे.
तुम्हाला पेन्शन कमी किंवा अधिक हवी असल्यास तुम्हाला त्या पध्द्तीने गुंतवणूक कमी किंवा वाढवावी लागेल. 18 ते 65 वर्षाचा कोणताही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतो.
कर बचत
NPS च्या माध्यमातून वर्षाला जवळपास 2 लाख रुपये कर बचत केली जाऊ शकते. आयकर नियम 80C अंतर्गत जवळपास 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात. यासह NPS मध्ये गुंतवणूक केल्या बद्दल 50,000 हजार रुपये अतिरिक्त सूट मिळते.
दोन प्रकारचे असतात NPS
NPS चे दोन प्रकार आहेत. यात NPS टियर 1 आणि NPS टियर 2. टियर-1 मध्ये किमान गुंतवणूक 500 रुपये आहे तर टियर-2 मध्ये 1000 रुपये आहे. दोन्ही प्रकारात गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. NPS मध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याचे पैसे कुठे गुंतवले जातील हे निवडायचे आहे. इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज आणि सरकारी बॉंड्स. त्यानुसार तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलल्यानंतर तुम्ही कोणती गुंतवणूक करावी हा निर्णय घेऊ शकता.