Top Recommended Stories

NTPC Recruitment 2022: NTPCमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 90,000 पर्यंत मिळेल पगार!

NTPC Recruitment 2022: एनटीपीसीने विविध कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Published: March 27, 2022 3:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

NTPC Recruitment 2022
NTPC Recruitment 2022

NTPC recruitment 2022 :  सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. NTPCने अनेक रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (NTPC Recruitment 2022) जारी केली आहे. एनटीपीसीने विविध कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 50 कार्यकारी पदं (कम्बाइंड सायकल पॉवर प्लांट) आणि 4 कार्यकारी (ऑपरेशन्स – पॉवर ट्रेंडिंग) आणि 1 कार्यकारी पदासाठी (बीडी पॉवर ट्रेडिंग) भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा.

Also Read:

अर्ज कसा करावा –

1. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NTPCची अधिकृत वेबसाइट www.ntpc.co.in ला भेट द्यावी.
2. वेबसाईटवरील करिअर पृष्ठावर जा.
3. अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
4. अर्ज सबमिट करा आणि अर्जाच्या प्रतिची प्रिंट आऊट काढून घ्या.

You may like to read

शैक्षणिक पात्रता –

एकत्रित सायकल पॉवर प्लांटसाठी –

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

अत्यावश्यक अनुभव – उमेदवाराने 100 मेगावॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या एकत्रित सायकल पॉवर प्रोजेक्ट किंवा प्लांटमध्ये किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी डिझाइन, बांधकाम किंवा ऑपरेशन आणि मेंटेनन्समध्ये काम केलेले असावे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना शिफ्टमध्ये काम करावे लागेल आणि त्यांना आवश्यकतेनुसार कुठेही पोस्ट केले जाऊ शकते.

ऑपरेशन्स – पॉवर ट्रेंडिंगसाठी –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक आहे.

आवश्यक अनुभव – पॉवर ट्रेडिंगच्या सिस्टम ऑपरेशन, प्रादेशिक लोड डिस्पॅच सेंटरमध्ये पॉवर शेड्यूलिंग, विविध भागांसाठी पॉवर एक्सचेंजमध्ये विडिंगमध्ये किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. या उमेदवारांनी लक्षात घ्यावे की त्यांना शिफ्टमध्ये काम करावे लागेल.

बीडी पॉवर ट्रेडिंगसाठी –

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असावा.

आवश्यक अनुभव – सिस्टम ऑपरेशन किंवा पॉवर ट्रेडिंगच्या व्यवसाय विकासामध्ये किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक किंवा DISCOM किंवा कॉर्पोरेट्स किंवा जनरेटर यांच्याशी कराराचे सखोल ज्ञान असावे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे संभाषण कौशल्य असावे.

अर्ज फी –

सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 300 रुपये भरावे लागतील. EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क देखील केवळ 300 रुपये द्यावे लागेल. तर SC/ST/PwBD/XSM श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

पगार –

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 90,000 रुपये पगार मिळेल. त्याव्यतिरिक्त त्यांना निवासी भत्ता, स्वत: साठी, जोडीदारासाठी आणि मुलांसाठी आरोग्य संबंधित सुविधा मिळतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या