नवी दिल्ली : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये (OIL) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी ऑइल इंडियाने कनिष्ठ सहाय्यकाच्या विविध पदांवर भरतीसाठी (Oil India Recruitment 2021) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (Oil India Recruitment 2021) ते Oil India ची अधिकृत वेबसाइट oilindia.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (Oil India Recruitment 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची (Oil India Recruitment 2021) अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे.Also Read - CRPF Head Constable Recruitment 2021: सीआरपीएफ मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी भरती; आत्ताच अर्ज करा, जाणून घ्या पात्रता

या व्यतिरिक्त थेट या लिंकवर https://register.cbtexams.in/OIL/Recruitment/ क्लिक करून देखील या पदांसाठी (Oil India Recruitment 2021) अर्ज दाखल करू शकतात. तसेच उमेदवार या लिंकवर जाऊन https://edumedias.s3.ap-south-1.amazonaws.com/OIL/VariousPost/Docs/Online_Advertisement_भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना (Oil India Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Oil India Recruitment 2021) एकूण 120 रिक्त जागा भरल्या जातील. Also Read - Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात नोकरीची सुवर्ण संधी; परीक्षेविना निवड; अर्ज करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक

ऑइल इंडिया भरतीसाठी महत्त्वपूर्ण तारखा (Oil India Recruitment 2021)

ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख – 1 जुलै
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट Also Read - Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख; आत्ताच करा अर्ज

ऑइल इंडिया भरतीसाठी आवश्यक पात्रता (Oil India Recruitment 2021)

उमेदवारांनी सरकारी मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून 40 टक्के गुणांसह 10 + 2 परीक्षा उत्तीर्ण केली असावी. तसेच उमेदवारांकडे किमान 06 महिन्यांच्या कालावधीचा कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला एमएस वर्ड, एमएस एक्सेल, एमएस पॉवरपॉईंट इत्यादींची पूर्णपणे माहिती असणे आवश्यक आहे.

ऑइल इंडिया भरतीसाठीसाठी वयोमर्यादा (Oil India Recruitment 2021)

सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे.
ओबीसी (नॉन-क्रीमीयर लेअर) उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे असावे.

ऑइल इंडिया भरतीसाठी अर्ज शुल्क (Oil India Recruitment 2021)

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील.
अनुसूचित जाती / जमाती / ईडब्ल्यूएस / बेंचमार्क अक्षम / माजी-सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे.