नवी दिल्ली : दुचाकी घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूरची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter Launch) चर्चेत होती. ती अखेर आज भारतामध्ये लाँच झाली आहे. कंपनीने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day) रविवारी ही स्कूटर लाँच केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या स्कूटरची प्रतीक्षा सुरु होती ती अखेर संपली आहे. कंपनीने ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे.

ओलाच्या स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत (Ola S1 Price) 85,099 रुपये आणि S1 Pro व्हेरिएंटची किंमत (Ola S1 Pro Pric) 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत आहे. ओला स्कूटरची ही किंमत दिल्लीनुसार (Ola Electric Scooter Price in Delhi) असून प्रत्येक राज्यानुसार ही किंमत बदलते. यामध्ये राज्याकडून देण्यात येणाऱ्या सब्सिडीचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटरची सर्वात कमी किंमत गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये ( Ola Electric Scooter Price in Gujarat) ही या स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आणि S1 Pro व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपयांपर्यंत आहे. तर दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान व्यतिरिक्त सर्व राज्यात या स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro व्हेरिएंटची किंमत 1,29,999 रुपयांपर्यंत आहे.

ओलाने आपल्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जबरदस्त फीचर्स ( Ola Electric Scooter features) दिले आहेत. जे देशात सध्या असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध नाहीत. कंपनीने या स्कूटरमध्ये ऑर्टिफिशियल साउंड सिस्टम (Artificial sound system ) दिली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मूडनुसार स्कूटरचा आवाज बदलू शकता. या स्कूटरमध्ये कंपनीने 4G कनेक्टिव्हिटी सिस्टम दिली आहे. जेणे करून ती सतत इंटरनेटशी जोडलेली राहील. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला या स्कूटरशी जोडून सर्व फीचर्स ऑपरेट करू शकता. ज्यात या स्कूटरच्या लॉक/अनलॉक सिस्टमचा देखील समावेश आहे.

एवढेच नाही तर ही स्कूटर तुमचा आवाज देखील ओळखते, त्यात व्हॉईस कमांड सिस्टम (Voice command system ) देखील देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त ‘हे ओला’ म्हणावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही स्कूटरमध्ये तुमचे आवडते संगीत तसेच GPS नेव्हिगेशन किंवा कोणालाही कॉल करु शकता. यामध्ये 7 इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले आणि स्पीकर देण्यात आला आहे.

ही स्कूटर लॉक आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला चावीचीही गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला स्कूटरला तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करावे लागेल आणि तुम्ही ते मोबाईल अॅपद्वारे लॉक आणि अनलॉक करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही स्कूटरच्या जवळ जाताच ही स्कूटर सेन्सर्सच्या मदतीने तुमची उपस्थिती जाणून अनलॉक होते आणि तुम्ही सेन्सर रेंजपासून दूर जाताच ही स्कूटर लॉक होते. ओला स्कूटरच्या मॅक्सिमम स्पीड रेंजबद्दल सांगायचे तर तो 115 किलोमीटर प्रति तास आहे. ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 3.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर 8.5 किलोवॅट पीक पॉवर जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरसह त्याची बॅटरी सुमारे 6 तासांत पूर्णपणे चार्ज होईल. या व्यतिरिक्त, ही बॅटरी कंपनीच्या सुपरचार्जरद्वारे फक्त 18 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

ओलाचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 180 ते 190 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. एवढेच नाही तर ही स्कूटर 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग फक्त 3 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे. त्याची टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास आहे. यात तीन भिन्न ड्रायव्हिंग मोड आहेत, ज्यात नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपरचा समावेश आहे. आकर्षक लुक आणि मजबूत इलेक्ट्रिक मोटरने सजलेली ही स्कूटर एकूण 10 रंगांमध्ये सादर केली आहे.