Top Recommended Stories

Omicron Symptoms: पालकांनो वेळीच व्हा सावध, लहान मुलांमध्ये दिसतात ओमिक्रॉनची ही लक्षणं!

Omicron Symptoms : लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची नेमकी काय लक्षणं दिसतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणे करुन त्यांचे पालक वेळीच सावध होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करतील...

Updated: January 31, 2022 2:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Covid-19 And Children
Covid-19 And Children

Omicron Symptoms : कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Second Wave of Corona) आता तिसरी लाट (Third Wave of Corona) आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनमुळे (Omicron) चिंतेत आणखी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) लहान मुलांना जास्त संसर्ग झाला होता. आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा देखील लहान मुलांना जास्त संसर्ग होताना दिसत आहे. आकडेवारी पाहिली तर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग सर्वात जास्त लहान मुलांना झाला आहे. लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनमुळे काही गंभीर लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागू शकते. मागच्या एका आठवड्यात भारतात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची नेमकी काय लक्षणं (Omicron Symptoms in Children) दिसतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणे करुन त्यांचे पालक वेळीच सावध होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करतील…

Also Read:

मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास व्हा सावध –

– थकवा
– डोकेदुखी
– घसा खवखवणे
– वाहते नाक
– शिंकणे

You may like to read

मुलांमध्ये ही लक्षणं सुद्धा दिसून येतात –

ओमिक्रॉनचा प्रभाव केवळ फुफ्फुसावरच होत नाही तर इतर अनेक अवयवांवरही होत आहे. मुलांमध्ये थकवा (Fatigue), डोकेदुखी (headache), घसा खवखवणे (sore throat), नाक वाहणे ( runny nose), शिंका येणे (sneezing) याशिवाय आणखी काही लक्षणे दिसून येत आहेत जी प्रौढांमध्ये दिसून येत नाहीत. ही नवीन लक्षणं म्हणजे पोट खराब होणे (Stomach Problem) आणि अंगावर पुरळ (Acne) येणे. ही लक्षणं दुर्मिळ आहेत आणि ती अनेक मुलांमध्ये दिसून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये कोरडा खोकला दिसून येत आहे. मुलांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी त्यांना सकस आहार देणे आवश्यक आहे. तसेच त्यांना मास्क (Mask), सॅनिटायझर (Sanitizer) वापरायला शिकवणे देखील तितकेच गरजेचे आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 31, 2022 2:06 PM IST

Updated Date: January 31, 2022 2:11 PM IST