Top Recommended Stories

Omicron व्हेरिएंटला हलक्यात घेण्याची चूक करू नका! WHO ने पुन्हा दिला सल्ला; म्हणाले, असे व्हायरस कधीच...

डॉ. टेड्रस म्हणाले, पुढील आठवडा हा अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर असणार आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. धोका अद्याप टळलेला नाही. लोकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देखील डॉ.टेड्रस यांनी दिला आहे.

Published: January 19, 2022 10:06 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus
WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus

Omicron Variant WHO advisory: कोरोना व्हायरस (Covid-19) आणि त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron Variant) जगभरात धुमाकूळ घातला. ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या (Omicron Patient) संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा सतर्क राहाण्याचा सल्ला (WHO advisory) दिला आहे. WHO ने म्हटले आहे, की ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेण्याची चूक करू नका. या व्हेरिएंटचा संपूर्ण जगात पसार होत असून तो कमी घातक समजण्याची चूक करू नका.

Also Read:

WHO म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट एक गैरसमज पसरवला जात आहे. तो म्हणजे, ओमिक्रॉन इतर व्हेरिएंट पेक्षा सौम्य आहे. कमी धोकादायक आहे. त्यामुळे लोक अजूनही त्याच्या धोक्याबाबत बेफिकीर आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काही लोकांना जीव गमवावा लागू शकतो. बहुतांश नागरिके खबरदार घेत नाही आहेत. गेल्या 2 वर्षांत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एका मागोमाग एक अशा अनेक लाटा येत आहेत. कोरोनासारखे व्हायरस कधीच संपत नाहीत. ते एकाप्रकारे परिसंस्थेचा भाग बनून जातात. असे, डॉ. टेड्रस यांनी स्पष्ट केले आहे.

You may like to read

डॉ. टेड्रस म्हणाले, पुढील आठवडा हा अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर असणार आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. धोका अद्याप टळलेला नाही. लोकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देखील डॉ.टेड्रस यांनी दिला आहे.

कोरोनासारखे व्हायरस कधीच संपत नाहीत..

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरससारखे विषाणू कधीच संपत नाहीत. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन बोलत होते. कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. तो कमी करण्यासाठी जगभरात प्रत्येक नागरिकाला कोरोनाप्रतिबंधात्मक लस मिळालीच पाहिजे. तरच आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 19, 2022 10:06 AM IST