Top Recommended Stories

Omicron's new strain : ओमिक्रॉनचा नवीन स्ट्रेन BA.2 ची भारतात एंट्री, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा व्हायरस

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा भारतात देखील वेगाने फैलाव होत आहे. या दरम्यान आता देशात ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए-2 आढळून आला आहे.

Published: January 24, 2022 2:41 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Omicron's new strain : ओमिक्रॉनचा नवीन स्ट्रेन BA.2 ची भारतात एंट्री, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा व्हायरस
BA.4 and BA.5 sub-variants are also on the radar of the World Health Organization (WHO).

Omicron’s new subvariant BA.2 enters India: जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा (Omicron) भारतात देखील वेगाने फैलाव होत आहे. या दरम्यान आता देशात ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए-2 (Omicron subvariant BA.2) आढळून आला आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. आतापर्यंत भारतात या सबव्हेरिएंटचे (BA.2) 530 नमुने आढळले आहेत.

Also Read:

या सबव्हेरिएंटची भारतात एंट्री

ओमिक्रॉनच्या सब-व्हेरियंटने (Omicron’s new subvariant) यूकेमध्ये खळबळ उडवून दिली आहे. पण आता भारतातही त्याने प्रवेश केला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते BA.2 प्रकार ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरतो. ब्रिटिश आरोग्य विभागाने (UK Health Security Agency) ओमिक्रॉनच्या या उप-प्रकाराशी संबंधित शेकडो प्रकरणांची नोंद केली आहे. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) या प्रकराच्या वाढत्या केसेसच्या तपासणीनंतर त्याचे नाव BA.2 ठेवले आहे.

You may like to read

भारतात आढळले 530 नमुने

माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांत यूकेमध्ये या प्रकाराची 400 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. एका ऑनलाइन न्यूज मीडिया रिपोर्टनुसार ओमिक्रॉन सब-व्हेरियंटचे 530 नमुने भारतात 181 स्वीडनमध्ये आणि 127 सिंगापूरमध्ये आढळले आहेत.

‘Omicron आणि BA.2 एकसारखेच

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) ओमिक्रॉन प्रकाराचे वर्णन ‘चिंतेचा प्रकार’ असे केले आहे. त्यानंतर ओमिक्रॉनचा उप-प्रकार BA.2 देखील त्याच्यासमानच असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. म्हणजेच या दोन्हींमध्ये कोणताही विशेष फरक नाही. मात्र भविष्यात साथीच्या रोगाच्या प्रसारावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सुमारे 40 देशांमध्ये आढळली BA.2 ची प्रकरणे

रिपोर्टनुसार आतापर्यंत सुमारे 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा नवा उप-प्रकार आढळला आहे. डेन्मार्कमध्ये सर्वाधिक BA.2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या नवीन प्रकारानंतर ओमिक्रॉन विषाणूमुळे वाढत असलेल्या साथीच्या लाटेची दोन वेगवेगळे शिखरे येऊ शकतात, अशी भीती डेनमार्कच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनच्या BA.2 उप-प्रकाराची ओळख केवळ जीनोम सिक्वेंसिंगद्वारे केली जाऊ शकते.

BA.2 स्ट्रेन अधिक संसर्गजन्य

UKHSA संचालक डॉ. मीरा चंद यांच्या मते Omicron हा सतत म्यूटेट करणारा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला नवीन प्रकार दिसत राहतील अशी अपेक्षा आहे. आम्ही त्याच्या जीनोम सिक्वेन्सिंगचे सतत निरीक्षण करत आहोत आणि धोक्याची पातळी ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. UKHSA ने इशारा दिला आहे की BA.2 स्ट्रेनमध्ये 53 सीक्वेंस आहेत जे अधिक संसर्गजन्य आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 2:41 PM IST