One Digital ID: देशातील प्रत्येक नागरिकासाठी असेल एकच ओळखपत्र, एकमेकांशी लिंक होणार आधार, PAN, DL आणि पासपोर्ट
One Digital ID: केंद्र सरकार आधार कार्डच्या धर्तीवर डिजिटल आयडीवर काम करत आहे, जे आगामी काळात देशातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून दिले जाईल. या डिजिटल आयडीमध्ये तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे लिंक करू शकाल.

One Digital ID: केंद्र सरकार आधार कार्डच्या धर्तीवर डिजिटल आयडीवर (Digital ID) काम करत आहे, जे आगामी काळात देशातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून दिले जाईल. या डिजिटल आयडीमध्ये तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे लिंक करू शकाल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट (Aadhaar Card, PAN Card, Passport, Driving License) यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. या डिजिटल आयडीमध्ये हे सर्व आयडी एकमेकांशी लिंक केले जातील आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी (EKYC) वेगळ्या आयडीची गरज लागणार नाही.
Also Read:
सरकारकडून Digital ID वर काम सुरू
इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने (MeitY) डिजिटल आयडीवर काम सुरू केले आहे. यासाठी सेंट्रलाइज्ड डिजिटल आयडेंटिटीजचे (Federated Digital Identities) नवीन मॉडेल प्रस्तावित करण्यात आले आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की वन डिजिटल आयडीच्या (One Digital ID) मदतीने नागरिक त्यांचे सर्व आयडी व्यवस्थापित करू शकतील. विशेष बाब म्हणजे One Digital ID मध्ये केंद्रीय कागदपत्रांसह विविध राज्यांची ओळखपत्रेही एकत्र ठेवता येतील.
सरकारने मागवल्या सूचना
या प्रस्तावित योजनेसाठी सरकारने 27 फेब्रुवारीपर्यंत सर्वसामान्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. आधार कार्ड पॅनशी लिंक करणेही प्रत्येकाला बंधनकारक आहे. मात्र One Digital ID आल्यानंतर नागरिकांना त्यांची इतर कागदपत्रे एकत्र जोडता येणार आहेत. हे खूप सोयीस्कर देखील सिद्ध होईल.
One Digital ID चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केंद्र सरकारसोबतच विविध राज्यांची ओळखपत्रेही एकमेकांशी जोडली जाऊ शकतात. यानंतर तुमचे सर्व आयडी एकाच ठिकाणी सुरक्षित राहतील. One Digital ID चा एक फायदा हा देखील असेल की तुम्हाला पुन्हा पुन्हा पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार नाही. सर्व आयडी एकमेकांशी जोडलेले असल्याने पडताळणी प्रक्रियाही खूप सोपी होणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या