OnePlus 10 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus 10 Pro स्मार्टफोन अधिकृतपणे बाजारात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असून तो अनेक उत्तम फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर विशेष फीचर म्हणून वापरण्यात आले आहे जो उत्कृष्ट परफॉर्मेंस प्रदान करेल.

Published: January 11, 2022 5:05 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

OnePlus 10 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
OnePlus 10 Pro smartphone launches with Snapdragon 8 Gen 1 processor, find out the price and features

OnePlus 10 Pro स्मार्टफोन अधिकृतपणे बाजारात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असून तो अनेक उत्तम फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर विशेष फीचर म्हणून वापरण्यात आले आहे जो उत्कृष्ट परफॉर्मेंस प्रदान करेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो second-generation low-temperature polycrystalline oxide टेक्नॉलॉजिने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये (OnePlus 10 Pro Launch) ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांसारखी अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

OnePlus 10 Pro: किंमत आणि उपलब्धता

OnePlus 10 Pro स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च झाला आहे. तिथे त्याच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 4,699 म्हणजेच सुमारे 54,500 रुपये आहे. तर 8GB + 256GB मॉडेलची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 58,000 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 61,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन 13 जानेवारीपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन Emerald Forest आणि Volcanic Black कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. मात्र कंपनीने अद्याप हा स्मार्टफोन भारत आणि इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

OnePlus 10 Pro: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

OnePlus 10 Pro अँड्राइड 12 ओएसवर आधारित आहे आणि त्यात 6.7 इंचाचा QHD+ curved AMOLED डिस्प्ले आहे. याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1,440×3,216 पिक्सेल आहे आणि ते 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 80W सुपर फ्लॅश चार्ज वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी यात 48MP प्रायमरी सेन्सर, 50MP सेकंडरी सेन्सर आणि 8MP टेलिफोटो शूटर देण्यात आला आहे. तर फोनचा फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 5:05 PM IST