Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच, रात्री उशिरा पोहोचले दुसरे विमान
Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन गंगा' राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 219 लोकांची पहिली तुकडी शनिवारी भारतात दाखल झाली. 250 भारतीयांना घेऊन दुसरे विमान रात्री उशिरा 3 वाजता नवी दिल्ली विमानतळावर पोहोचले.

Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 219 लोकांची पहिली तुकडी शनिवारी भारतात दाखल झाली. 250 भारतीयांना घेऊन दुसरे विमान रात्री उशिरा 3 वाजता नवी दिल्ली विमानतळावर (Evacuation of Indians) पोहोचले. तर 240 भारतीय नागरिकांना घेऊन तिसरे विमान आज दिल्लीसाठी रवाना झाले. रशियाने शुक्रवारी युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia war) केला होता. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्नांना वेग आला आहे. हल्ल्यापूर्वीच एक विमान भारताकडे (Delhi Airport) रवाना झाले होते.
Also Read:
- IndiGo Flight Engine Fire: इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, दिल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग; 184 प्रवासी थोडक्यात बचावले!
- Delhi News : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, Indigo विमानाखाली आली कार; तपासाचे आदेश
- Corona Virus: विमान प्रवासात मास्क बंधनकारक, नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई, दिल्ली हायकोर्टाने दिले आदेश!
युक्रेनमधून बुखारेस्ट (रोमानिया) मार्गे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या 250 भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन (V Muralitharan) दिल्ली विमानतळावर दाखल झाले. एक्झिट गेटवर उभे राहून त्यांनी परत आलेल्या लोकांना फुले देऊन प्रोत्साहन दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की ‘आम्ही अनेक मुलांशी बोललो, त्यांनी शौर्याने आणि धैर्याने आपली जबाबदारी पार पाडली याचे आम्हाला कौतुक आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांच्या जोडीदार आणि मित्रांना सांगावे की सरकारची ही मोहीम सर्व नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणेपर्यंत सुरूच राहील. पंतप्रधान स्वतः युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले आहेत. भारत सरकार रशिया सरकारशीही चर्चा करत आहे’.
आम्ही तुमच्यासोबत आहोत, युक्रेनमधील भारतीय दूतावासाचा संदेश
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की ते देशाच्या पूर्वेकडील भागात बदलत्या घडामोडी आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच दूतावासाने भारतीय नागरिकांना संयम बाळगून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दूतावासाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. “युक्रेनच्या पूर्व भागातील बदलत्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून, आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना आमचा संदेश आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं ट्वीट दुतावासाकडून करण्यात आले आहे.
पिकअप पॉईंटवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी 9 ते 10 किमी चालले
एअर इंडियाच्या विशेष विमानातून विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या केबिन क्रू प्रभारी रजनी पॉल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ‘आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही भारतीयांना त्यांच्या घरी आणण्यासाठी या ऑपरेशनचा एक भाग बनलो आहोत. काही विद्यार्थी पिकअप पॉईंटवर पोहोचण्यासाठी सामान घेऊन 9 ते 10 किमी चालत आले, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या