मुंबईः Oppo ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी Oppo A93s 5G स्मार्टफोनचा समावेश केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप तसेच 90Hz रिफ्रेश रेट यासह अनेक खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन उत्कृष्ट परफॉर्मेंस क्षमतेसह दमदार बॅटरी बॅकअप देखील देणार आहे. दरम्यान, कंपनीने हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लाँच केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची लॉन्चिंग किंवा उपलब्धता याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.Also Read - 5G Smartphone : नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? Redmi आणि Realme चे हे लवकरच होणार लॉन्च

Oppo A93s 5G किंमत आणि उपलब्धता

Oppo A93s 5G चीनमध्ये एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि त्याची किंमत CNY 1,999 म्हणजेच 22,900 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन Early Summer Light Sea, Summer Night Star River आणि White Peach Soda कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. चीनमध्ये 30 जुलैपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. (Oppo A93s 5G smartphone Launch with 8GB RAM find out the price and features) Also Read - New Oppo smartphone : 'ओप्पो'ने लाँच केला 13 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo A93s 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A93s 5G अँड्रॉइड 11 बेस्ड ColorOS 11.1 वर आधारित आहे आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1,080 ×2,400 पिक्सल स्क्रीन रेजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंट तसेच मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच याचे स्टोरेज 256GB पर्यंतचा वाढवता येऊ शकते. (Oppo A93s 5G smartphone Launch with 8GB RAM find out the price and features) Also Read - Amazon Great Republic Day Sale 17 जानेवारीपासून सुरू, स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपपर्यंत मिळेल भरघोस सूट

Oppo A93s 5G मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असून त्याचे प्रायमरी सेन्सर 48MP आहे, तर 2MP पोर्ट्रेट लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सोयीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. (Oppo A93s 5G smartphone Launch with 8GB RAM find out the price and features)