Top Recommended Stories

महागाईने बेजार झाला पाकिस्तान! टोमॅटो 500 रुपये किलो तर 300 रुपये किलोवर पोहोचला कांदा

Pakistan Flood : पाकिस्तानवर आस्मानी संकट कोसळलं आहे. पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी भाज्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 500 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

Published: August 29, 2022 2:15 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

टोमॅटो 500 रुपये किलो तर 300 रुपये किलोवर पोहोचला कांदा
टोमॅटो 500 रुपये किलो तर 300 रुपये किलोवर पोहोचला कांदा

Pakistan Flood : आपल्या शेजारचा देश पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण पूरस्थितीचा सामना करत आहे. 30 लाखांहून अधिक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शाहबाज शरीफ सरकारने गुरुवारी अधिकृतपणे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

पाकिस्तान येत्या 30 ऑगस्टसा जिनेव्हा आणि इस्लामाबादमध्ये पूरग्रस्तांसाठी संयुक्त राष्ट्रांचे ‘फ्लॅश अपील’ सुरू करणार आहे. पाकिस्तानवर कोसळलेल्या आस्मानी संकटामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. परिणामी भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत.

You may like to read

टोमॅटो 500 रुपये किलो तर कांद्याचा दर 300 रुपये किलोवर पोहोचला आहे. आधीच पूरस्थितीने बेजार झालेले नागरिक आता महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 1000 हून नागरिकांचा बळी गेला आहे. त्यात 343 लहान मुलांचा समावेश आहे.

समा टीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, टोमॅटोचा सरकारी दर 80 रुपये प्रति किलो आहे. मात्र, आता त्यात तब्बल सहा पटीने वाढ झाली आहे. टोमॅटो 500 रुपये किलो प्रति किलोग्रॅम दराने विकला जात आहे. त्याच कांदा देखील 300 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. यासोबत आलं आणि लसणाचे दर देखील वाढले आहेत.

आता आम आदमी केवळ टोमॅटोकडे पाहू शकतो, खरेदी करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली आहे. कांदा कधी काळी 61 रुपये प्रति किलोग्रॅम विकला जात होता. आता कांद्याचा दर प्रतिकिलो 250 ते 300 रुपयांवर पोहोचला आहे.


दरम्यान, पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला आहे. नदी, नाल्यांना आलेल्या महापूरामुळे अनेक शहरे, गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानात 5.5 अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कपाशीच्या पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. तर कांदा, टोमॅटो आणि मिरचीचे मोठे नुकसान झालं आहे. गव्हाचे देखील नुकसान झाले आहेक. परिणामी देशात खाद्य सुरक्षेला मोठा धोका पोहोचला आहे. पूरामुळे कृषी क्षेत्र मोठ्याप्रमाणात उद्धवस्त झाल्यामुळे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाकिस्तानी नागरिकांना मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>