Top Recommended Stories

PAN-Aadhar Card Link: तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात फक्त दोन दिवस!

तुम्ही पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhar Card) लिंक केले नसेल तर तुमच्या महत्त्वाची बातमी आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज (30 मार्च) आणि उद्या (31 मार्च) फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. केंद्र सरकारने (Union Government) दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.

Published: March 30, 2022 2:49 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

PAN-Aadhar Card Link: तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात फक्त दोन दिवस!

PAN-Aadhar Card Link: तुम्ही पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhar Card) लिंक केले नसेल तर तुमच्या महत्त्वाची बातमी आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज (30 मार्च) आणि उद्या (31 मार्च) फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. केंद्र सरकारने (Union Government) दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. 1 एप्रिलनंतर पॅन-आधार कार्डला लिंक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे हा दंड पुढील तीन महिने असेल. त्यानंतर म्हणजेच जूननंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1000 हजार रुपये मोजावे लागतील.

दरम्यान, सन 2017 मध्ये केंद्र सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 31 एप्रिलपर्यंत ही मर्यादा आणखी वाढवली जाण्याची शक्यता तशी कमीच आहे.

You may like to read

…तर व्यवहार ठप्प होणार

मिळालेली माहिती अशी, की प्रामुख्याने NIR लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. NIR भविष्यात भारतात आले आणि त्यांची बँक खाती NRO प्रकारची नसतील तर त्यांच्या बॅंक खात्यातील ठप्प होतील.

दोन मिनिंटात करून घ्या पॅन-आधार कार्ड लिंक…

– Pan-Aadhar कार्ड एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल.
– एक फॉरमॅट निश्चित केला आहे. यूआयडीएपीएन (12 अंकी-आधार क्रमांक) स्पेस (10 अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा.
– एखाद्याचा आधार कार्ड नंबर ABCD12345678 आहे व पॅन कार्ड क्रमांक XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS करताना हा फॉरमॅट “ABCD12345678 WXYZ123456” असा असेल.
– https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.