मुंबई: डिजिटल इंडियाच्या युगातील आधार कार्ड आणि पॅन कार्ड (PAN Card) हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. बँकिंग सेवांपासून खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक असते. अशा परिस्थितीत तुमच्याजवळ पॅन असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा तुमचे पॅन कार्ड हरवले (PAN card lost) असेल तर काळजी करण्याची गरज नाही. ते बनवून घेण्याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही. (PAN Card: If you lose your PAN card, get free PAN immediately; know the whole process Get New PAN card PAN card lost)Also Read - Aadhaar-PAN कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन वाढवली, जाणून घ्या कधी आहे शेवटची तारीख!

अशा प्रकारे बनवता जाईल पॅन कार्ड  (Get New PAN card)

पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. येथे आधार सेक्शनच्या मदतीने इन्स्टंट पॅनवर जा. येथे उघलेल्या नवा पृष्ठावर आपल्याला नवीन पॅन मिळवा (Get New PAN) वर क्लिक करावे लागेल. यानंतर येथे आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर OTP जनरेट करा. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आधार तपशील प्रविष्ट करून सबमिट करा. Also Read - IRCTC Ticket Booking: रेल्वे तिकिट बुकिंगसाठी बदलणार नियम; Aadhaar आणि Pan होणार अनिवार्य

यानंतर पॅन कार्डसाठी ईमेल आयडी टाका. तुमचा आधार ई-केवायसी डेटा ePAN मध्ये हस्तांतरित केला जाईल. या प्रक्रियेनंतर तुम्हाला पीडीएफमध्ये पॅन प्रदान केले जाईल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून ते पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता किंवा तुमच्या मेलवर सुद्धा शोधू शकता. (PAN Card: If you lose your PAN card, get free PAN immediately; know the whole process Get New PAN card PAN card lost) Also Read - IRCTC Ticket Booking: रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आता Aadhaar आणि Pan कार्ड अनिवार्य; जाणून घ्या नवी सिस्टीम

इनकम टॅक्स वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal आणि ‘इन्स्टंट ई-पॅन’ वर क्लिक करा. येथे ‘नवीन ई-पॅन’ वर क्लिक करा आणि तुमचा पॅन क्रमांक टाका. जर तुम्हाला पॅन क्रमांक आठवत नसेल तर आधार क्रमांक टाका. येथे नियम आणि अटी ‘स्वीकारा’. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. समोर आलेल्या तपशीलांची ‘पडताळणी’ करा. आता तुमचे पॅन कार्ड PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल. आपण ते येथून डाउनलोड करू शकता.