मुंबई: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर (Pandora Papers Leak) जगातील धनाढ्यांनी विदेशात संशयास्पद आर्थिक गुंतवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स (Pandora Papers) या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह 300 भारतीय दिग्गजांची नावं असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.Also Read - Sachin Tendulker ची कन्या आहे खूप देखणी! बॉलिवूडचा 'हा' अभिनेता झाला लट्टू

‘इंडियन एक्सप्रेस’नुसार, या पेपर्समध्या सचिनशिवाय पत्नी अंजली तेंडूलकर (Anjali Tendulkar), सासरे आनंद मेहता (Anand Mehata) यांच्या नावाचा समावेश आहे. किमान 60 प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांच्या ऑफसोर्स होल्डिंगची चौकशी करण्यात आली. येत्या काळात आणखी नावे उघड होण्याची शक्यता आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Also Read - Vasu Paranjape Passes Away: मुंबई क्रिकेटचा 'द्रोणाचार्य' हरपला, Sachin Tendulkar झाला भावुक

पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, भारतातील केवळ राजकारणी आणि सेलिब्रिटींनीच नाही तर महसूल विभागाचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पेंडोरा पेपर्समधील 11.9 मिलियम अर्थात 1.19 कोटी फायलींच्या लीकमध्ये पनामा, दुबई, मोनाको, स्वित्झर्लंड आणि केमॅन बेटांसारख्या दिग्गज करदात्यां समजल्या जाणाऱ्या ट्रस्ट आणि कंपन्यांचे दस्ताऐवज आहेत. त्यात जगातील 35 राजकीय नेत्यांची नावं आहेतय इतकंच नाही तर यात सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. Also Read - ...तर मला जिवंत जाळलं असतं; शोएब अख्तरनं Sachin Tendulkar बाबत केला मोठा खुलासा

सचिन तेंडूलकरसह आणखी कोणाची नावे?

सचिन तेंडूलकर–

क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांचं नाव पंडोरा पेपर्स लीकमध्ये समोर आलं आहे. सचिन तेंडूलकर हे राज्यसभेचे सदस्य आहेत. क्रीडा विश्वात सचिन यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. ‘इंडियन एक्सप्रेस’नुसार, या पेपर्समध्या सचिनशिवाय पत्नी अंजली तेंडूलकर, सासरे आनंद मेहता यांच्या नावाचा समावेश आहे.

अनिल अंबानी –

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी (Anil Ambani) यांचं नाव देखील समोर आलं आहे. अनिल अंबानी आणि त्याच्या प्रतिनिधींच्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडड्स आणि साइप्रसमध्ये 18 ऑफशोर कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची स्थापना 2007 ते 2010 मध्ये करण्यात आली होती. त्यापैकी 7 कंपन्यांनी कोट्यावधींचं कर्ज घेतलं आहे. तर 1.3 बिलियन डॉलर (9648कोटी रुपयांपेक्षा जास्त ) गुंतवणूक करण्यात आली आहे.

नीरव मोदी –

हिरे व्यापारी नीरव मोदी यांचं नाव देखील समोर आलं आहे. नीरव मोदीनं देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा चूना लावला आहे. जानेवारी 2018 मध्ये देशातून पलायन केलेल्या नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिने ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंड्समध्ये एका कंपनीची स्थापना केली होती. ट्राइडेंट ट्रस्ट कंपनी, सिंगापूरच्या माध्यमातून यात मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. ब्रुकटोन मॅनेजमेंट लिमिटेडची स्थापना डिसेंबर 2017 मध्ये करण्यात आली होती.

सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी दावा फेटाळला

दुसरीकडे, सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून या सगळ्या प्रकारानंतर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असा दावा सचिन तेंडूलकरच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.