Top Recommended Stories

Paytmने लाँच केले Pops Messenger, युजर्सला असा होणार फायदा!Paytmने लाँच केले Pops Messenger, युजर्सला असा होणार फायदा!

Paytm Pops Messenger: पेटिएम मनीने लाँच केलेल्या पॉप्ससोबत वापरकर्त्यांना आपल्या स्टॉकसंबधी विशिष्ट माहिती जाणून घेता येणार आहे.

Published: January 28, 2022 12:36 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Paytm, Pops, messenger, stocks markets, market news,
(फोटो प्रतीकात्‍मक)

Paytm Pops Messenger: डिजिटल पेमेंटमध्ये अग्रगण्य असलेल्या Paytmने पॉप्स मेसेंजर (Pops Messenger) लाँच केले आहे. paytm ओनर One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या गुंतवणूक आणि बाजाराची स्थिती  (market position) ट्रॅक करण्याच्या पद्धतीत क्रांतीकारी बदल घडेल. पेटिएम मनीने (Paytm Money) लाँच केलेल्या पॉप्ससोबत वापरकर्त्यांना आपल्या स्टॉकसंबधी विशिष्ट माहिती जाणून घेता येणार आहे. यात पोर्टफोलियोबाबत विश्लेषण (Portfolio Analysis), बाजारातील घडामोडी (market developments) आणि बाजाराचील महत्वाच्या हालचाली (market movements) या सर्व गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

हे प्लॅटफॉर्म स्टॉक शिफारसी, बातम्या आणि इतर सेवेसाठी मार्केटप्लेस (Market Place) म्हणून देखील कार्य करेल. पेटीएम मनी (Paytm Money) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर करून शिफारशी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी कंपनीने डेली ब्रिफसोबत भागीदारी देखील केली आहे जी अनेक माध्यमांद्वारे बातम्या सुव्यवस्थित करते आणि प्रमुख टेकअवे सादर करते.

You may like to read

गेल्या काही वर्षात भारतीय बाजारपेठेत (Indian market) अनेक नव्या गुंतवणुकदारांचे आगमन झाले असून त्यांच्या हालचाली दिसून येत आहे. हे गुंतवणुकदार आपली गुंतवणूक शिकण्यासह ट्रॅक करू इच्छितात. मनी अ‍ॅपवर पॉप्सच्या (Pops) सहाय्याने हे गुंतवणूकदार नियमितपणे आपले पोर्टफोलिओवर लक्ष ठेवत अलर्ट राहून बाजारातील बारकावे शिकू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.